NIOS 10th, 12th Result 2021 : दहावी, बारावीचा निकाल जाहीर, results.nios.ac.in वर करा चेक
संस्थेकडून माध्यमिक, उच्च माध्यमिक वर्गासाठी 22 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2021 या कालावधीत परीक्षा घेण्यात आल्या होत्या. (NIOS X, XII results announced, check on results.nios.ac.in)

नवी दिल्ली : नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ओपन स्कूल (NIOS) द्वारा जानेवारी ते फेब्रुवारी 2021 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक (इयत्ता 10) आणि उच्च माध्यमिक (इयत्ता 12) च्या सार्वजनिक परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यासंदर्भात एनआयओएसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करुन माहिती प्रसिद्ध केली आहे. ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, माध्यमिक व वरिष्ठ माध्यमिक सार्वजनिक परीक्षेचा निकाल आज जाहीर केल्याचे म्हटले आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षांमध्ये भाग घेतला आहे, त्यांनी results.nios.ac.in वर जाऊन निकाल तपासावा. (NIOS X, XII results announced, check on results.nios.ac.in)
असा पहा निकाल
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी उमेदवारांनी प्रथम results.nios.ac.in वर लॉग इन करावे. यानंतर, मुख्यपृष्ठावर उपलब्ध पब्लिक एक्झामिनेशन रिझल्ट लिंकवर क्लिक करा. यानंतर नविन पेज ओपन होईल. येथे उमेदवारांनी आपला नावनोंदणी क्रमांक आणि कॅप्चा प्रविष्ट करुन सबमिट करावे. आता आपला निकाल स्क्रीनवर दिसून येईल. उमेदवारांनी त्यात दिलेला तपशील तपासावा. पुढील वापरासाठी ते डाऊनलोड करा आणि हार्ड कॉपी काढा.
22 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2021 कालावधीत परीक्षा संपन्न
संस्थेकडून उच्च माध्यमिक वर्गासाठी 22 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2021 या कालावधीत परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यानुसार 22 जानेवारी रोजी पहिला पेपर संस्कृत होता, तर शेवटी व्यवसाय अभ्यास पेपर घेण्यात आला. त्याचप्रमाणे 22 जानेवारी रोजी हिंदुस्थानी संगीत पेपरद्वारे माध्यमिक परीक्षेची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी रोजगार कौशल्य आणि कर्नाटक संगीत पेपरने परीक्षा संपन्न झाली. हे उल्लेखनीय आहे की नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ओपन स्कूलने जानेवारी ते फेब्रुवारी, 2021 मध्ये होणाऱ्या परीक्षेचे हॉल तिकिट 15 जानेवारी रोजी जारी केले होते. अधिकृत वेबसाईट sdmis.nios.ac.in वर हॉल तिकिट उपलब्ध करुन देण्यात आले होते. एनआयओएसने थिअरी आणि प्रॅक्टिकल या दोन्ही परीक्षांचे हॉल तिकिट दिले होते. (NIOS X, XII results announced, check on results.nios.ac.in)
धोत्र्याचे फायदेhttps://t.co/0sbRuArklk#Health #DhotraFlower #Jimsonweed #DaturaStramonium
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 15, 2021
इतर बातम्या
रतन टाटांकडून ‘या’ कंपनीची भागीदारी खरेदी; शेअरमध्ये थेट 10 टक्क्यांची उसळी
भज्जीच्या घरी येणार आणखी एक चिमुकला पाहुणा ! सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली ‘गुडन्यूज’