NIRF Ranking 2021: केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून एनआआरएफ रँकिंग जाहीर, IIT मद्रास अव्वसस्थानी, महाराष्ट्रातील एक संस्था टॉप टेनमध्ये
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 2021 साठी नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क जाहीर केलं आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे गेल्यावर्षी प्रमाणं यंदा देखील रँकिंग ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे जाहीर करण्यात आलं आहे.
NIRF Ranking 2021 नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 2021 साठी नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क जाहीर केलं आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे गेल्यावर्षी प्रमाणं यंदा देखील रँकिंग ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे जाहीर करण्यात आलं आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मद्रासनं पहिलं स्थान पटकावलं आहे. यावर्षी टॉप रिसर्च इन्स्टिट्यूट ही कॅटेगरी देखील समाविष्ट करण्यात आली आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान एकूण 10 कॅटेगरीमधील रँकिंग जाहीर केलं आहे. ओवरऑल, विद्यापीठ, व्यवस्थापन, कॉलेज, फार्मसी, मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, एचआरआआए आणि कायदा या संदर्भातील संस्थांचं रँकिंग जारी केल आहे. एनआयआरएफ रँकिंग शैक्षणिक संस्थांना टीचिंग लर्निंग अँड रिसोर्सेस, रिसर्च अँड प्रोफेशनल प्रॅक्टिस, ग्रॅज्युएशन आऊटकम, आऊटरिच अँड इँक्ल्यूसिवीट, परसेप्शन याआधारे दिलं जातं.
देशातील टॉप टेन संस्था
1. IIT मद्रास 2. IISc, बेंगळुरू 3. IIT दिल्ली 4. IIT बॉम्बे 5. IIT खरगपूर 6. IIT कानपूर 7. IIT गुवाहाटी 8. JNU 9. IIT रुड़की 10. BHU
आयआयटी मद्रास प्रथम क्रमांकावर
“आयआयटी मद्रास पुन्हा एकदा एकूण श्रेणीत देशातील सर्वोत्तम संस्था आहे.”, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. विद्यापीठ श्रेणीमध्ये, आयआयएससी बंगळुरू या वर्षी पहिल्या स्थानावर आहे आणि जेएनयू दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचप्रमाणे, आयआयटी मद्रास ही अभियांत्रिकी श्रेणीतील देशातील सर्वोत्तम संस्था आहे. त्यानंतर आयआयटी दिल्ली आणि त्यानंतर आयआयटी बॉम्बे आहे.
व्यवस्थापन श्रेणी
व्यवस्थापन श्रेणी मध्ये आयआयएम अहमदाबाद, आयआयएम बंगलोर आणि आयआयएम कलकत्ता ही देशातील तीन सर्वोत्तम व्यवस्थापन महाविद्यालये आहेत. त्याचबरोबर मिरांडा हाऊस, एलएसआर फॉर वुमन दिल्ली आणि लोयोला कॉलेज, चेन्नई ही देशातील तीन सर्वोत्तम महाविद्यालये आहेत.
At the release of India Rankings 2021. https://t.co/ocJZwTktqJ
— Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) September 9, 2021
फार्मसी श्रेणी
फार्मसी कॅटेगरीत जामिया हमदर्द, नवी दिल्ली प्रथम स्थानावर, पंजाब विद्यापीठ चंदीगड दुसऱ्या स्थानावर आणि एनआयपीईआर मोहाली तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर वैद्यकीय श्रेणीमध्ये एम्स दिल्ली पहिल्या स्थानावर, पीजीआयएमईआर चंदीगड दुसऱ्या आणि ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोर तिसऱ्या स्थानावर आहे.
“एनआयआरएफ रँकिंग 2021 साठी 11 श्रेणींमध्ये जाहीर करण्यात मला आनंद होत आहे, असं रँकिंग जाहीर करताना शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले. मी सर्व रँकिंग मिळवलेल्या संस्थांचे अभिनंदन करतो. आज देशात 50 हजारांहून अधिक उच्च शिक्षण संस्था आणि 50 दशलक्ष विद्यार्थी आहेत. त्यांच्यासाठी रँकिंग आवश्यक आहे, असंही धर्मेंद्र प्रधान म्हणाले आहेत.
इतर बातम्या:
राज्यसभेच्या 6 रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, राजीव सातव यांच्या रिक्त जागेवर कुणाला संधी?
राजस्थानच्या बाडमेरमध्ये हायवे झाला रनवे, राजनाथ सिंह आणि नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन
छगन भुजबळ यांना सर्वात मोठा दिलासा, महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील सर्व आरोपातून मुक्तता!
NIRF Ranking 2021 Update Education Minister Announced Name Of Top National Institutional Ranking Framework