GPAT 2021 परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार, निकाल कुठे पाहणार?

नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) GPAT परीक्षा 2021चा निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे. GPAT exam result update

GPAT 2021 परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार, निकाल कुठे पाहणार?
ग्रॅज्युएट फार्मससी ॲप्टिट्यूड टेस्ट
Follow us
| Updated on: Mar 16, 2021 | 11:53 AM

नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) GPAT परीक्षा 2021चा निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे. (NTA GPAT Result 2021) ज्या विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएट फार्मससी अ‌ॅप्टिट्यूड टेस्ट या परीक्षा दिली असेल त्यांनी gpat.nta.nic.in या वेबसाईटला भेट द्यावी. एनटीएच्या वेबसाईटवर GPAT 2021 परीक्षेचा निकाल जाहीर होईल. एनटीएकडून यापूर्वी उत्तरतालिका जाहीर करण्यात आल्या होत्या. उत्तरतालिकांवर आक्षेप नोंदवण्यासाठी 11 मार्च 2021 पर्यंत संधी देण्यात आली होती. ( NTA Graduate Pharmacy Aptitude Test 202 result released soon know how to check result)

ग्रॅज्युएट फार्मससी अ‌ॅप्टिट्यूड टेस्ट (GPAT 2021) चे आयोजन नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून करण्यात आले होते. ही परीक्षा 27 फेब्रुवारी रोजी झाली होती. ही परीक्षा देशपातळीवर घेतली जाते. फार्मसी अभ्यासक्रमांच्या पदव्युत्तर वर्गांना प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. 2018 नंतर या परीक्षेचे आयोजन नॅशनल टेस्टिंग एजन्सी कडे देण्यात आलं आहे.

निकाल पाहण्याची पद्धत (How to check result of NTA GPAT 2021)

नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतल्या गेलेल्या ग्रॅज्युएट फार्मससी अ‌ॅप्टिट्यूड टेस्ट 2021 चा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना एनटीएच्या वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर खाली दिलेल्या टिप्सचा वापर करुन निकाल पाहता येईल येईल.

1. विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकृत वेबसाईटवर gpat.nta.nic.in वर भेट द्यावी.

2. या वेबपेजवर Result for GPAT 2021 यावर क्लिक करावे

3. यानंतर ओपन झालेल्या लॉगीन विंडोमध्ये अर्ज क्रमांक आणि इतर माहिती टाकून लॉगीन करावं.

4. विद्यार्थ्यांना यानंतर GPAT 2021 परीक्षेचा निकाल उपलब्ध होणार आहे.

परीक्षेचे स्वरुप

ग्रॅज्युएट फार्मससी अ‌ॅप्टिट्यूड टेस्ट (GPAT 2021) परीक्षेत 125 प्रश्न विचारले जातात. एक प्रश्न 4 गुणांसाठी विचारला जातो. ही परीक्षा देशातील विविध राज्यांमध्ये आयोजित केली जाते. उत्तर प्रदेशातील आग्रा, नोएडा, इलाहाबाद, बरेली, गाझियाबाद, गोरखपूर, ग्रेटर नोएडा, लखनऊ, वाराणसी, कानपूर आणि मेरठ मध्ये झाली होती. राजस्थानातील जयपूर, जोधपूर, कोटा आणि उदयपूर शहरातदेखील ग्रॅज्युएट फार्मससी अ‌ॅप्टिट्यूड टेस्ट (GPAT 2021) परीक्षा घेतली जाईल. याशिवाय मध्य प्रदेश, बिहार, दिल्ली, आसाम, आंध्र प्रदेश, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, झारखंड आणि इतर राज्यांमध्ये आयोजित केली गेली.

संबंधित बातम्या

GPAT admit card 2021 परीक्षेचे अ‍ॅडमिट कार्ड जारी, डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत

Fact Check : मोदी सरकारकडून विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप? या योजनेमागील सत्य काय?

( NTA Graduate Pharmacy Aptitude Test 202 result released soon know how to check result)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.