Jee Main Result 2021: जेईई मेन्स परीक्षा निकालात 2 मुलींची बाजी, दिल्लीची काव्या चोप्रा, तेलंगाणाच्या कोमा शरण्याला पहिली रँक

दिल्लीची काव्या चोप्रा तर तेलंगाणाच्या कोमा शरण्या या दोघींनी टॉप 18 मध्ये स्थान पटकावलं आहे. jeemain.nic.in आणि nta.ac.in या वेबसाईटवर सकाळी 8 वाजता विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल.

Jee Main Result 2021: जेईई मेन्स परीक्षा निकालात 2 मुलींची बाजी, दिल्लीची काव्या चोप्रा, तेलंगाणाच्या कोमा शरण्याला पहिली रँक
जेईई टॉपर्स
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 9:40 AM

Jee Main Result 2021 नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात आलेल्या JEE MAIN 2021 च्या चौथ्या सत्राचा निकाल मध्यरात्री उशिरा जाहीर करण्यात आला. चौथ्या सत्राची परीक्षा 26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2021 दरम्यान आयोजित करण्यात आली होती. जेईई मेन परीक्षेत एकूण 18 विद्यार्थ्यांना टॉप 1 रँक मिळाली आहे. तर, 44 जणांना 100 परफेक्ट एनटीए गुण मिळाले आहेत. टॉप 18 मध्ये दोन मुलींचा देखील समावेश आहे. दिल्लीची काव्या चोप्रा तर तेलंगाणाच्या कोमा शरण्या या दोघींनी टॉप 18 मध्ये स्थान पटकावलं आहे. jeemain.nic.in आणि nta.ac.in या वेबसाईटवर सकाळी 8 वाजता विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल.

जेईई मेन सत्र 4 परीक्षा टॉपर्स

महाराष्ट्राचा अथर्व तांबट टॉप 18 मध्ये

अथर्व अभिजित तांबट  हा नवी मुंबईतील Ryan International School, Sanpada चा विद्यार्थी आहे. तो मार्च महिन्यात जाहीर झालेल्या जेईई मेनच्या निकालातही टॉपर्सच्या यादीत होता. फायनल रँकिंगमध्ये टॉप 1 रँक मिळवत अथर्व तांबट यांनं महाराष्ट्राची मान उंचावली आहे.

जेईई मेन 2021 सत्र 4 चा कसा पाहायचा?

स्टेप 1: निकाल तपासण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर भेट द्या. स्टेप 2: वेबसाइटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. स्टेप 3: तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख सबमिट करून लॉगिन करा. स्टेप 4: तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. स्टेप 5: निकाल डाऊनलोड करुन त्याची प्रिंट आऊट घ्या

जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षेसाठी नोंदणी सुरु होणार

चौथ्या सत्राच्या निकालासोबत एनटीए ऑल इंडिया रँक आणि प्रवर्ग निहाय कट ऑफ लिस्ट जारी करेल. जेईई अॅडव्हान्सड परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. तिचा निकाल 15 ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाईल. जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षेसाठी नोंदणी जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर सुरु होईल.

मातृभाषेत परीक्षा

नव्या शिक्षण धोरणानुसार जेईई मेन 2021 सत्राची परीक्षा इंग्रजी आणि हिंदी भाषेसह तेलुगू, तामिळ, पंजाबी, उर्दू, ओडिशा, मराठी, मल्याळम, कन्नड, बंगाली, आमामी आणि गुजराती भाषेमध्ये घेतली गेली. आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी आणि इतर सरकारी अनुदानित तांत्रिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी समुपदेशन जेईई अ‌ॅडव्हान्सड एएटी परीक्षेच्या निकालानंतर सुरू होईल. जेईई मेन परीक्षा चौथ्या सत्राचा निकाल jeemain.nic.in आणि nta.ac.in या वेबसाईटवर निकाल जाहीर होईल.

जेईई मेन परीक्षा

जेईई मेन ही राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा आहे. पदवीस्तरावरील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) JEE मुख्य परीक्षा आयोजित करते.

इतर बातम्या:

JEE Main Result 2021: जेईई मेनचा निकाल जाहीर, नंबर 1 रँकवर 18 जण, महाराष्ट्राचा एकमेव अथर्व अभिजीत तांबट टॉपमध्ये

JEE Main 2021 March Result:जेईई मेन मार्च सत्रात महाराष्ट्रातील दोघांचा डंका, 100 एनटीए गुणांची कमाई

NTA JEE Main Results 2021 Declared Check Session 4 Result at jeemain.nta.nic.in Toppers and Pass Percentage Kavya Chopra and Komma Sharanya get rank first in Marathi

...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.