AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत, मित्रांना भेटल्याचा आनंद, उस्मानाबादच्या ग्रामीण भागातील शाळा सुरु

उस्मानाबाद जिल्ह्यात आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा तब्बल दीड वर्षांनंतर शाळा सुरु झाल्याने विद्यार्थीचा आनंद गगनात मावेनासा झाला. (Osmanabad School reopen After and half year)

गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत, मित्रांना भेटल्याचा आनंद, उस्मानाबादच्या ग्रामीण भागातील शाळा सुरु
उस्मानाबाद जिल्ह्यात आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा तब्बल दीड वर्षांनंतर शाळा सुरु झाल्याने विद्यार्थीचा आनंद गगनात मावेना झाला.
Follow us
| Updated on: Jul 15, 2021 | 2:46 PM

उस्मानाबाद : जिल्ह्यात आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा तब्बल दीड वर्षांनंतर शाळा सुरु झाल्याने विद्यार्थीचा आनंद गगनात मावेनासा झाला. कोरोनामुक्त गावात शाळा सुरु झाल्याने ऑनलाईन क्लास करुन कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील खानापूर येथील केशव विद्या मंदिर येथील विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन शिक्षकांनी त्यांचं स्वागत केले. (Osmanabad School reopen After and half year)

स्कूल चले हमे, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

गेल्या 1 महिन्यात कोरोना रुग्ण ज्या गावात सापडलं नाही त्या गावात शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून एका बाकड्यावर एका विद्यार्थीला बसविण्यात आले तर शाळेत आल्यावर सॅनिटायझरसह ऑक्सिजन पातळी ताप इ. आरोग्य तपासणी करण्यात आली. अनेक दिवसानंतर शाळा सुरू झाल्याने शिक्षक, मित्र, मैत्रिणी यांना भेटण्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. कोरोना नियमांचे पालन करत सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याची माहिती मुख्याध्यापक एकनाथ चव्हाण व शिक्षक बाबुराव भोसले यांनी दिली.

ग्रामीण भागांत शाळेची घंटा वाजली, शहरी भागातील शाळा अजूनही कुलूपबंद

कोरोना नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.  ग्रामीण भागातील शाळा सुरु झाल्या तरी शहरी भागातील शाळा ह्या कुलूपबंद आहेत. त्यामुळे शहरी भागातील मुलांचा हिरमोड झाला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात 500 गावे कोरोनामुक्त, दोन दिवसांत किती शाळा सुरु, चित्र स्पष्ट होणार

उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास 500 गावे कोरोनामुक्त आहेत. त्या गावात शाळा सुरु करण्याबाबत दिलेला ठराव पालकांची संमती व कोरोनाची स्थानिक स्तिथी पाहून निर्णय घेतला जात आहे. आगामी 2 दिवसात किती शाळा सुरू होतील व किती विद्यार्थी शाळेत हजर राहतील, याचे चित्र स्पष्ट होईल अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी गजानन सुसर यांनी दिली.

उस्मानाबादेत कोरोनाची स्थिती काय?

उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या कोरोनाचे रुग्ण कमी झाले असून केवळ 545 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जिल्ह्यात आजवर कोरोनाचे 59 हजार 209 इतके रुग्ण सापडले असून त्यापैकी 57 हजार 281 इतके रुग्ण उपचार नंतर बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर हा 96.74 टक्के आहे तर कोरोनाने रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाने 1 हजार 383 रुग्णांचा बळी घेतला असून मृत्युदर 2.33 टक्के आहे तर कोरोना तपासणीत रुग्ण सापडण्याचे प्रमाण हे 3 टक्केच्या जवळपास आहे.

(Osmanabad School reopen After and half year)

हे ही वाचा :

औरंगाबादेत शाळेची घंटा वाजली, तब्बल दीड वर्षानंतर विद्यार्थ्यांचा किलबिलाट

उस्मानाबादमध्ये पावसाचा कहर, पुरात वाहून जाणाऱ्या दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरु

उस्मानाबादमध्ये तब्बल 485 कोरोना मृत्यू आकड्याची तफावत, आरोग्य उपसंचालकांनी बजावली कारणे दाखवा नोटीस

अजित पवार हा फुटलेला गट आहे, संजय राऊतांचा टोला
अजित पवार हा फुटलेला गट आहे, संजय राऊतांचा टोला.
चुकून पाकच्या हद्दीत गेलेला तो जवान भारतात; कुटुंबीयांच्या भावना अनावर
चुकून पाकच्या हद्दीत गेलेला तो जवान भारतात; कुटुंबीयांच्या भावना अनावर.
मध्य रेल्वेने प्रवास करताय? आज उद्या विशेष ब्लॉक, कधी कुठे आणि कसा?
मध्य रेल्वेने प्रवास करताय? आज उद्या विशेष ब्लॉक, कधी कुठे आणि कसा?.
पाकिस्तानने पी. के. साहूंना भारताच्या ताब्यात सोपवलं
पाकिस्तानने पी. के. साहूंना भारताच्या ताब्यात सोपवलं.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रो-9 मार्गिकेच्या चाचणीला सुरुवात
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रो-9 मार्गिकेच्या चाचणीला सुरुवात.
अरुणाचल प्रदेशात चीनच्या कुरघोड्या सुरुच, भारतानं खडसावत थेट म्हटलं...
अरुणाचल प्रदेशात चीनच्या कुरघोड्या सुरुच, भारतानं खडसावत थेट म्हटलं....
आधी पाकला छुपा पाठिंबा, आता तुर्कस्तान म्हणतंय, चांगल्या वाईट काळात...
आधी पाकला छुपा पाठिंबा, आता तुर्कस्तान म्हणतंय, चांगल्या वाईट काळात....
तेव्हा मला अजित दादांकडून ऑफर होती, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट
तेव्हा मला अजित दादांकडून ऑफर होती, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट.
भारतानं एका झटक्यात पाकच्या चौक्या उडवल्या, व्हिडीओ पाहताच म्हणाल....
भारतानं एका झटक्यात पाकच्या चौक्या उडवल्या, व्हिडीओ पाहताच म्हणाल.....
संजय राऊतांकडून राज ठाकरे आणि नारायण राणेंचं तोंड भरून कौतुक!
संजय राऊतांकडून राज ठाकरे आणि नारायण राणेंचं तोंड भरून कौतुक!.