बोर्डाच्या परीक्षा घेणार की प्रमोट करणार? पाकिस्तानात दहावी बारावीच्या परीक्षांवर काय चाललंय?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानत सोमवारी बोर्ड परीक्षा आयोजित करण्याबाबत बैठक झाली. Pakistan Education department class 10 th and 12 exam

बोर्डाच्या परीक्षा घेणार की प्रमोट करणार? पाकिस्तानात दहावी बारावीच्या परीक्षांवर काय चाललंय?
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 12:51 PM

नवी दिल्ली: कोरोना संसर्ग वाढत असल्याने भारतात सीबीएसई बोर्डानं दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय प्रमोट करण्यात कोण येणार आहे. बारावीच्या परीक्षा कशा घ्यायच्या याबाबत भारतात सध्या चर्चा सुरू आहे. दुसरीकडे पाकिस्तानामध्ये सध्या कोरोनाच्या काळात काय सुरू आहे हे फार महत्वाचं आहे. कोरोना स्थिती असताना देखील पाकिस्तान सरकारने कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना प्रमोट केलं जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या शिक्षणमंत्र्यांनी सोमवारी हा निर्णय जाहीर केला. पाकिस्तानात दहावी आणि बारावीच्या परीक्षा 20 जून नंतर घेतल्या जाणार आहेत. (Pakistan Education department taking decision to conduct class 10 th and 12 exam after 20 June)

पाकिस्तानातील वेबसाईट डाऊन चा रिपोर्ट नुसार केंद्रीय शिक्षण मंत्री शकत महमूद यांनी राज्याच्या शिक्षण मंत्र्यांची बैठक घेतली. त्या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत दहावी आणि बारावीच्या परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. एकाही विद्यार्थ्याला परीक्षा न देता प्रमोट करण्यात येणार नाही, असेही या बैठकीत ठरले याचे वृत्त देण्यात आला आहे.

नववी आणि अकरावीच्या सुद्धा परीक्षा

पाकिस्तानच्या शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केलेल्या निर्णयानुसार दहावी बारावीची परीक्षा 20 जून नंतर होणार आहे. तर या सोबत नववी आणि अकरावीच्या परीक्षा देखील घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर परीक्षा आयोजित करताना पाकिस्तानी शिक्षण मंत्रालयाने विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या दोन महिन्या वरून काही आठवड्यावर आणण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसातच उन्हाळी सुट्ट्या जाहीर केल्या जाणार आहेत, अशी माहिती आहे.

द एक्सप्रेस ट्रिब्यून या वृत्तपत्राने सिंध प्रांताच्या एका प्रतिनिधीच्या हवाल्याने बैठकीत दहावी आणि बारावीच्या परीक्षा संबंधी चर्चा झाल्याची माहिती दिली. या बैठकीत नववी आणि अकरावीच्या परीक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव होता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याचे देखील आला होता. मात्र, शिक्षण मंत्र्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या या निर्णयामुळे पाकिस्तानात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट केले जाणार नाही. त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये परीक्षा द्यावी लागेल. दहावी आणि बारावीचे परीक्षा आयोजित करताना ज्या शिक्षकांचे लसीकरण झालेलं आहे आणि ज्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण झालेलं आहे त्यांना परीक्षेच्या कामात सहभागी होता येईल.

कोरोनाची तिसरी लाट आणि पालकांमध्ये भीती

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने पाकिस्तानात परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दुसरीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सरकारने नववी ते बारावीपर्यंतच्या परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या नियमांचं पालन करून परीक्षा आयोजित केली जाणार आहे.

संबंधित बातम्या:

दहावीच्या परीक्षा कशा घ्यायच्या? धनंजय कुलकर्णींकडून वर्षा गायकवाड यांना निवेदन, वाचा सविस्तर

JEE Advanced Exam 2021: जेईई ॲडव्हान्सड परीक्षा लांबणीवर, नेमकं कारण काय?

(Pakistan Education department taking decision to conduct class 10 th and 12 exam after 20 June)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.