पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती सरळसेवेनं करा, डी.एड. बी.एड. धारक आदिवासी विद्यार्थ्यांचं आमरण उपोषण
पालघर जिल्ह्यातील अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या 1662 रिक्त जागा सरळसेवा शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं.
पालघर: आदिवासी समाजातील डी.एड, बीएड धारक विद्यार्थ्यांनी पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केलं आहे. पालघर जिल्ह्यातील अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या 1662 रिक्त जागा सरळसेवा शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. विद्यार्थ्यांनी आमरण उपोषण सुरु केलं असून आंदोलकांमध्ये विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
1662 जागा सरळसेवेनं भरा
पालघर जिल्ह्यातील अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या 1662 रिक्त जागा सरळसेवा शिक्षक भरती प्रक्रियेद्वारे भराव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आली आहे. वारंवार पत्रव्यवहार, निवेदने, आंदोलने करून सुद्धा त्याची दखल न घेतल्यामुळे आदिवासी डीटीएड, बीएड कृती समितीच्या नेतृत्वात आंदोलन सुरु करण्यात आलंय. जिल्ह्यातील आदिवासी समाजातील डीटीएड, बीएड धारक विद्यार्थ्यांनी पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.उपोषणात मोठ्या संख्येने विद्यार्थिनींचा सहभाग आहे.
श्रमजीवी संघटनेचा तहसीलदार कार्यालयावर धड़क मोर्चा
श्रमजीवी संघटनेच्या वतीने पालघर तहसीलदार कार्यालयावर आज धडक मोर्चा काढत ठिय्या आंदोलन करण्यात आले. स्वतंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होत आली तरीही गरीब गरजू आदिवासी बांधवांना रेशनकार्ड, घरकुल, आधारकार्ड, जॉबकार्ड, मतदान ओळखपत्र, वीज, पाणी यांसारख्या जिल्ह्यातील प्रत्येक घटकाला मूलभूतसुविधा मिळालेल्या नाही त्या मिळाव्यात अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. आंदोलनात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे तसेच जो पर्यंत या सर्व मागण्यांबाबत आश्वासन मिळत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे,,या आंदोलनात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि महिलांचा सहभाग आहे
श्रमजीवी संघटना संस्थापक विवेक पंडित यांचा वाढदिवस संघर्ष दिन म्हणून पालघर, ठाणे,रायगड, नाशिक इतर जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयावर आज विविध आदिवासींच्या मागण्या संदर्भात मोर्चा काढण्यात आला.
श्रमजीवी संघटनेच्या मागण्या
1)आदिवासी समाजातील प्रत्येक घटकाला घरकुळाचा लाभ मिळण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात यावा 2)वनजमिनी वरील घराखालील जागा वस्तीस्थानाचे दावे घेऊन घराखालील जागा त्यांच्या नावे करण्यात यावी 3)रोजगार हामी कायद्याप्रमाणे मागेल त्याला काम द्यावे 4)आदिम जातील व अधिवासींना एकाच वेळी सर्व दाखले देण्यात यावे 5)आदिवासींना विना मूल्य आधारकार्ड देण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम राबविण्यात यावी 6)आदिम कातकरिना अंत्योदय योजनेचा लाभ मिळावा 7)सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात २४तास डॉक्टर उपलब्ध व्हावा
इतर बातम्या:
‘..अन्यथा नृसिंहवाडीला जलसमाधी घेऊ’, पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राजू शेट्टींचा सरकारला इशारा
‘अजितदादा काय म्हणतात त्याला काडीची किंमत नाही’, बैलगाडा शर्यतीबाबत गोपीचंद पडळकरांचा टोला
Palghar D.ED and B.ED students started protest for Teacher Recruitment