पवईच्या आयआयटीची जगात उत्तुंग भरारी ; सर्वोत्कृष्ट 50 विद्यापीठांमध्ये मिळवले स्थान

पवईच्या आयआयटीची जगात उत्तुंग भरारी ; सर्वोत्कृष्ट 50 विद्यापीठांमध्ये मिळवले स्थान (Powai's IIT rises to prominence in the world; Ranked in the top 50 universities)

पवईच्या आयआयटीची जगात उत्तुंग भरारी ; सर्वोत्कृष्ट 50 विद्यापीठांमध्ये मिळवले स्थान
IIT बॉम्बेने स्कोअर कार्ड केले जारी, थेट लिंकवरून करा डाउनलोड
Follow us
| Updated on: Mar 05, 2021 | 1:56 PM

नवी दिल्ली : पवईच्या आयआयटी बॉम्बेची यशाची पताका जगात फडकली आहे. जगातील 50 सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत आयआयटी बॉम्बेने स्थान पटकावले आहे. यासह भारतातील आयआयटी मद्रास, आयआयटी खरगपूर यासह 12 शैक्षणिक संस्थांचा सर्वोत्कृष्ट 100 विद्यापीठांच्या यादीत समावेश आहे. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅकींगमध्ये भारतीय विद्यापीठांनी बाजी मारली आहे. भारतीय विद्यापीठांच्या जवळपास 25 अभ्यासक्रमांचा जगभरातील सर्वोत्कृष्ट 100 अभ्यासक्रमांमध्ये समावेश करण्यात आला आहे. आयआयटी-बॉम्बेसह तीन भारतीय तंत्रज्ञान संस्थांनी पहिल्या 100 अभियांत्रिकी संस्थांच्या प्रतिष्ठित गटात प्रवेश केला आहे. त्याचबरोबर आयआयटी दिल्ली ( 54 वा क्रमांक) आणि आयआयटी मद्रास ( 94 वा क्रमांक) यांनी आपला परफॉर्मन्स उत्कृष्ट असल्याचे सिद्ध केले. अमेरिकेतील एमआयटीने आपला पहिला क्रमांक कायम राखला आहे. (Powai’s IIT rises to prominence in the world; Ranked in the top 50 universities)

केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडून भारतीय संस्थांचे अभिनंदन

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी 100 सर्वोत्कृष्ट विद्यापीठांत स्थान मिळवणाऱ्या 12 भारतीय शैक्षणिक संस्थांचे अभिनंदन केले. मागील काही वर्षांत उच्च शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले. जागतिक पातळीवर भारतीय शैक्षणिक संस्थांनी पटकावलेले यश हा त्याच प्रयत्नांचा चांगला परिणाम आहे, अशी प्रतिक्रिया पोखरियाल यांनी दिली. 12 भारतीय संस्थांमध्ये आयआयटी बॉम्बे, आयआयटी दिल्ली, आयआयटी मद्रास, आयआयटी खडगपूर, आयआयएससी बंगळूरु, आयआयटी गुवाहाटी, आयआयएम बंगळुरू, आयआयएम अहमदाबाद, जेएनयू, अण्णा विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ आणि ओपी जिंदल विद्यापीठ यांचा समावेश असल्याचे पोखरीयाल यांनी सांगितले. पहिल्या 100 क्रमांकाच्या संस्थांपैकी पेट्रोलियम अभियांत्रिकीच्या वर्गवारीत आयआयटी मद्रास जगात 30 व्या स्थानावर आहे. तसेच खनिज व खाण अभियांत्रिकीसाठी आयआयटी मुंबई 41 व्या आणि आयआयटी खडगपूर 44 व्या क्रमांकावर आहे. केंद्रीय विकास मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. जागतिक पातळीवर भारताच्या सर्वाधिक संस्थांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

बंगळुरूतील भारतीय विज्ञान संस्थान 92 व्या स्थानावर

एनआयआरएफ 2020 मध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या बंगळुरूतील भारतीय विज्ञान संस्थान (आयआयएससी) या संस्थेने नैसर्गिक विज्ञानासाठी 92 व्या स्थानावर झेप घेतली आहे. क्यूएसने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, बंगळुरुच्या आयआयएससीनंतर आयआयटी बॉम्बे (114), आयआयटी मद्रास (177) आणि आयआयटी दिल्ली (210) यांचा नंबर लागतो. त्याचप्रमाणे आयआयटी-मद्रास पेट्रोलियम अभियांत्रिकी कार्यक्रमासाठी 30 व्या क्रमांकावर आहे. आयआयटी-बॉम्बे आणि आयआयटी-खडगपूर यांनी खनिज व खाण अभियांत्रिकी विषयात अनुक्रमे 41 आणि 44 वे स्थान पटकावले आहे. यावर्षीच्या विषय क्रमवारीत सार्वजनिक क्षेत्रातील प्रसिद्ध संस्थांनी मिळवलेले हे सर्वोच्च क्रमांक आहेत, असे क्यूएसच्या निवेदनात म्हटले आहे. (Powai’s IIT rises to prominence in the world; Ranked in the top 50 universities)

इतर बातम्या

SSC HSC Exams 2021 : वर्षा गायकवाडांनी ठासून सांगितलं, काठिण्य पातळी गौण, आमची तयारी झालीय!

Post Office मध्ये धमाकेदार योजना, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 40 हजारांचा फायदा; झटपट तुम्हीही करा संधीचं सोनं

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.