NEP: नव्या शैक्षणिक धोरणाची वर्षपूर्ती, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय शिक्षणमंत्री कार्यक्रमाला संबोधित करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त एका कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत.

NEP: नव्या शैक्षणिक धोरणाची वर्षपूर्ती, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय शिक्षणमंत्री कार्यक्रमाला संबोधित करणार
PM Narendra Modi
Follow us
| Updated on: Jul 26, 2021 | 6:25 PM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त एका कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. नरेंद्र मोदी सरकारनं गेल्या वर्षी 29 जुलै रोजी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केलं होतं. नव्या शिक्षण धोरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधतील.

एएनआयचं ट्विट

नव्या शैक्षणिक धोरणाची वैशिष्ट्ये

  1. बहुभाषिक शिक्षण – नवीन शैक्षणिक धोरणात बहुभाषिक शिक्षण प्रणालीवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. त्यामुळे आता शिक्षक केवळ इंग्रजी भाषांसह इतर प्रादेशिक भाषाही शिकवतील.
  2. यापुढे MPhil परीक्षा रद्द केल्या जातील. ज्या विद्यार्थ्यांना विविध विषयात संशोधन करायचे आहे, त्यांना MPhil करण्यास परवानगी दिली जाणार नाही. जर एखाद्या विद्यार्थ्याला एखादा कोर्स करताना दुसरा कोर्स करण्याची इच्छा असेल, तर त्याला पहिल्या कोर्सपासून काही काळ ब्रेक घ्यावा लागेल.
  3. अनेक ई-कोर्स सुरु केले जातील, वर्च्युअल लॅब्सही विकसित केल्या जातील.
  4. तंत्रज्ञान आणि ऑनलाईन शिक्षण पद्धतीवर भर दिला जाईल.
  5. खासगी, सार्वजनिक तसेच विविध इन्सिस्ट्युट या सर्वांसाठी एकच नियमावली केली जाईल. म्हणजेच यापुढे फी निश्चित केली जाईल.
  6. शिक्षण क्षेत्रात सार्वजनिक गुंतवणूक लवकरात लवकर जीडीपीच्या 6 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. सध्या ही गुंतवणूक राज्य आणि केंद्र सरकारकडे 4.43 टक्के इतकी आहे.

नवा शैक्षणिक आकृतीबंध

नव्या धोरणाच्या मसुद्यात मुलांच्या वयाऐवजी विकासाच्या टप्प्यांवर आधारित 5 + 3 + 3 + 4 असा अभ्यासक्रम आणि शैक्षणिक रचना प्रस्तावित आहे. तीन वर्षे वयोगटापासून 18 वर्षांपर्यंतची मुले आता शिक्षणाचा अधिकार या कायद्याच्या कक्षेत येतील.

सध्या, हा कायदा केवळ 14 वर्षे वयापर्यंत विद्यार्थ्यांना लागू आहे. पूर्व-प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण आणि 2025 पर्यंत सर्वांना मूलभूत साक्षरता प्रदान करणे, हे नवीन शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे.

  • वय 3-8 वर्षे : पूर्व प्राथमिक तीन वर्षे आणि इयत्ता पहिली-दुसरी
  • वय 8-11 वर्षे : प्राथमिक शिक्षण – इयत्ता तिसरी ते पाचवी
  • वय 11-14 वर्षे : पूर्व माध्यमिक शिक्षण – इयत्ता सहावी ते आठवी
  • वय 14-18 वर्षे : माध्यमिक शिक्षण – इयत्ता नववी ते बारावी

इतर बातम्या:

Maharashtra FYJC CET 2021: अकरावीच्या सीईटीसाठी नोंदणीस मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन करण्याची संधी

JEE Main 2021: पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, जेईई मेनच्या तिसऱ्या सत्राच्या परीक्षेची पुन्हा संधी मिळणार, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा

Prime Minister Narendra Modi will address via video conferencing the event to mark one year of the New Education Policy on 29th July

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.