पुणे – शहरातील यंदा दहावी व बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पुणे महानगर पालिकेने मोठा दिलासा दिला आहे . शिक्षण विभागाच्या शाळातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे शुल्क महापालिका भरणार आहे. महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे.स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी याबाबत माहिती दिली आहे.
महानगरपालिकेत एकूण 44 माध्यमिक शाळा
पुणे महानगरपालिकेत एकूण 44 माध्यमिक शाळांच्या मधून 4 हजार 392 विद्यार्थी परीक्षा देणारा आहेत. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला415 रुपये व तंत्रशाळेतील 200विद्यार्थ्यांचे प्रति 525असे दहावीच्या विद्यार्थ्यांचे शुल्क भरावे लागणार आहे. तर महापालिकेच्या शिक्षण विभागातील पाच कनिष्ठ महाविद्यालयातील 449 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसणार आहेत. या सर्वांचे वाणिज्य शाखेचे 430रुपये आणि विज्ञान शाखेसाठी प्रति 490 रुपये परीक्षा शुल्क भरले जाणार आहे.
पेपर सोडवण्यासाठी जास्तीचा वेळ
कोरोनामुळे ऑनलाईन शाळा सुरु आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या सरावावर झाला आहे.यामुळे विद्यार्थ्यांना गत वर्षी परीक्षेत पेपर सोडवण्यासाठी वेळ वाढवून देण्यात आली होती. त्याचप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी वेळ वाढवून देण्यात आला आहे. यात 70 ,80 व 100गुणांच्या पेपरसाठी अर्धातास , तर 40 , 50 व60 गुणांच्या परीक्षेसाठी15 मिनिटांचा वेळा वाढवून देण्यात आला आहे.
वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. यामध्ये दहावीच्या परीक्षा 15मार्च ते4 एप्रिल2022 पर्यंत होणार आहेत. तर बारावीच्या परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च 2022 पर्यंत पार पडणार आहेत. सकाळी साडेदहाला पेपर सुरु केले जाणार आहेत.
Kharmas 2021 | भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी खरमास दरम्यान या 6 गोष्टी करा