पुण्याच्या जिल्हा परिषद शाळेची भरारी, रोबोटिक्स शिक्षणातून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे

पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीना रोबोटिक्स बनविण्याचे धडे दिले जात आहेत. यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील मुलं रोबोटिक्स बनवितात जे शिक्षण राष्ट्रीय शाळेमध्ये दिल जात आहे. आता आधुनिकशि क्षण देण्याच्या इच्छा शक्तीमुळे जिल्हा परिषद च्या शाळेत रोबोटिक्स बनवण्याचे धडे मिळत आहेत.

पुण्याच्या जिल्हा परिषद शाळेची भरारी, रोबोटिक्स शिक्षणातून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे
पुणे जिल्हा परिषद शाळा रोबोटिक्सचे धडे
Follow us
| Updated on: Oct 21, 2021 | 4:25 PM

पुणे: पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीना रोबोटिक्स बनविण्याचे धडे दिले जात आहेत. यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील मुलं रोबोटिक्स बनवितात जे शिक्षण राष्ट्रीय शाळेमध्ये दिल जात आहे. आता आधुनिक शिक्षण देण्याच्या इच्छा शक्तीमुळे जिल्हा परिषद च्या शाळेत रोबोटिक्स बनवण्याचे धडे मिळत आहेत. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जांभूळ दरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत रोबोटिक्स बनवण्याचं शिक्षण दिलं जातं. आधुनिक विज्ञानाच्या शिक्षणाचे धडे देण्याची किमया या शाळेतील शिक्षक नागनाथ विभूते हे करीत आहेत. विभूते पाचवी ते सातवीच्या विध्यार्थ्यांचा भविष्याचा पाया आत्ताच भक्कम करतायेत.

राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण ग्रामीण भागात

रोबोटिकचं शिक्षण राष्ट्रीय स्तरावरील शाळा मध्ये दिल जातं मात्र चक्क पुण्याच्या खेड मधील जिल्हा परिषद शाळेत आता ते दिलं जातंय. जांभुळदरा शाळेचे शिक्षक नागनाथ विभूते या विध्यार्थ्यांना नेहमीच असं तंत्रज्ञानाशी जोडून ठेवत आहेत. त्यांचा हा खटाटोप पाचवी ते सातवीच्या विध्यार्थ्यांचा इंजिनियरिंगचा पाया आत्ताच भक्कम करतोय.

विद्यार्थ्यांचा हुरुप वाढला

टरटल रोबोट ( कासव रोबोट ), क्लँप रोबोट( टाळी वाजवल्यावर थांबते व पळतो), क्रोक रोबोट ( चालणारी मगर) आणि ट्राय सायकल ( तीन चाकी सायकल) रोबोट विद्यार्थी आता स्वतः तयार करत आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये चांगलाच हुरूप वाढलाय. नागनाथ विभूतेंसारख्या शिक्षकांमुळं जिल्हा परिषद शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोय. हा सकारात्मक बदल घडत असल्याने शाळेचे मुख्याध्यापक व इतर शिक्षक हे विभुतेंच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे असतात. जांभूळदरा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यपाक भास्कर गाडगे यांनी या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केलाय.

स्पर्धेत टिकण्यासाठी तंत्रज्ञानाचं शिक्षण गरजेचं

काही वर्षपूवी इंग्रजी माध्यमाच्या शाळा नव्हत्या त्यावेळी जिल्हा परिषद शाळेतूंच विद्यार्थी घडायचे. ते विद्यार्थी आज विविध क्षेत्रात चांगल्या हुद्द्यावर देखील आहेत. पण आता काळ बदललाय. इंग्रजी माध्यमांच्या शाळाचे फॅड ग्रामीण भागातही आलेय अशावेळी जिल्हा परिषद शाळेतील विध्यार्थ्यांना या स्पर्धेच्या युगात टिकवायचे असेल तर असं तंत्रज्ञानाचे वापर करून विद्यार्थ्यांना नवे शिक्षण देण्याची खरी गरज पुढील काळात आहे

इतर बातम्या:

गडकरी-फडणवीसांचा 36 चा आकडा, वडेट्टीवारांचा दावा, गडकरी म्हणतात, देवेंद्र भावासारखे…

विमा कंपन्या शेतकऱ्यांशी अडेलतट्टूपणे वागत असतील तर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही, अजितदादांचा इशारा

Pune Khed Jambhuldara ZP School Nagnath Vibhute teach student about robotics

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.