Pune Rain: पुण्यातल्या सर्व शाळा आज बंद! धरणक्षेत्रात मोठा पाऊस, खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय

14 ते 17 जुलै दरम्यान पर्यटन स्थळाच्या (Tourist Places) 1 किलोमीटर परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलीय. तसंच आदेशाचं उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आलाय. सतर्कतेच्या इशाऱ्यानंतर आज पुण्यातील सगळ्या बंद राहतील अशी माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलीये.

Pune Rain: पुण्यातल्या सर्व शाळा आज बंद! धरणक्षेत्रात मोठा पाऊस, खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय
Pune SchoolsImage Credit source: Pinterest
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 10:56 AM

पुणे: पुण्यातल्या सगळ्या शाळा (Pune Schools) आज खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात येणार आहेत. रात्री पासून पाऊस थांबलाय.धरणाच्या सांडव्यातून चालू असणारा 13138 क्युसेक विसर्ग कमी करण्यात आलाय. त्याचबरोबर पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची अशी माहिती देण्यात आलीये. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. दरम्यान काल पुणे जिल्ह्यात असलेल्या सर्वच धरणक्षेत्रात मोठा पाऊस झालाय. हवामान विभागानं (Meteorological Department) मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर पुणे जिल्ह्यातील सर्वच पर्यटन स्थळांवर प्रशासनाकडून कलम 144 अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आलीय. 14 ते 17 जुलै दरम्यान पर्यटन स्थळाच्या (Tourist Places) 1 किलोमीटर परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलीय. तसंच आदेशाचं उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आलाय. सतर्कतेच्या इशाऱ्यानंतर आज पुण्यातील सगळ्या बंद राहतील अशी माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलीये.

सर्व शाळा 14 जुलै रोजी बंद राहतील

पुणे महानगरपालिकेने (PMC) जाहीर केले आहे की प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज पाहता नागरी कार्यक्षेत्रातील सर्व शाळा गुरुवारी बंद राहतील. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. पीएमसीचे शिक्षणाधिकारी पोपट काळे म्हणाले, “… नागरी संस्थेद्वारे चालवल्या जाणार्‍या पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, वरिष्ठ माध्यमिक, खाजगी, अनुदानित किंवा विनाअनुदानित यासह सर्व शाळा 14 जुलै रोजी बंद राहतील.” तथापि, सर्व नागरी शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पीएमसीच्या आपत्ती व्यवस्थापन-संबंधित कामात सहभागी होण्यासाठी संबंधित शाळांना कळवावे लागेल.

हे सुद्धा वाचा

पुण्यात वाहतूक कोंडी

विशेष म्हणजे शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीतही जिल्हा जलसंपदा विभागाने पाणी सोडले आहे. संततधार पावसामुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून त्यामुळे पुण्यात वाहतूक कोंडी होत आहे. दरम्यान, पुण्यातील शिवणे परिसरातील मुठा नदीवर बांधलेल्या बुडत्या पुलावरून चालत असताना बुधवारी एक व्यक्ती वाहून गेली, तर लाईटच्या खांबावर अडकलेल्या दुसऱ्याला वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.