Pune School Reopen : पुण्यात उद्यापासून शाळा कॉलेज पुन्हा सुरु होणार, पहिली ते आठवीचे वर्ग 4 तास भरणार
उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी घोषणा केल्याप्रमाणं पुण्यातील शाळा आणि महाविद्यालयं 1 फेब्रुवारी म्हणजेच उद्यापासून शाळा (Pune School Reopen) सुरु होणार आहेत.
पुणे : उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी घोषणा केल्याप्रमाणं पुण्यातील शाळा आणि महाविद्यालयं 1 फेब्रुवारी म्हणजेच उद्यापासून शाळा (Pune School Reopen) सुरु होणार आहेत. विद्यार्थ्यांचं लसीकरणावर जोर देण्यात येणार येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. पहिली ते आठवीचे वर्ग चार तास सुरु राहतील, असं अजित पवार म्हणाले इयत्ता पहिली ते 8 वी हाफ डे आणि नववी ते दहावी पूर्णवेळ शाळा सुरू राहील, असंही ते म्हणाले. तसेच नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचं लसीकरण (Corona Vaccine) करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांचं शाळेतच लसीकरण केलं जाणार आहे. याबाबतची माहिती शाळा चालक आणि संचालकांना देण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं होतं.उद्यापासून शाळा सुरु होत असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
पुण्यात उद्यापासान शाळा सुरु, पहिली ते आठवीचे वर्ग चार भरणार
पालकमंत्री अजित पवार यांच्या आदेशाप्रमाणं पुणे जिल्ह्यात उद्यापासून शाळा महाविद्यालय सुरु होणार आहेत. पुण्यात लहान मुलांच्या तब्येतीविषयी खबरदारीचा उपाय म्हणून पहिली ते आठवीचे वर्ग चार तास भरवण्यात येणार आहेत. तर, नववी आणि दहावीचे वर्ग हे पूर्णवेळ भरवले जातील, असा निर्णय घेण्यात आला होता.
पालकांची संमती महत्त्वाची
उद्यापासून शाळा सुरु होत असल्या तरी विद्यार्थ्यांना शाळेत येताना पालकांची संमती सादर करावी लागेल. पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठण्यासंदर्भातली संमत्रीपत्र दिल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
आठवडाभर हाफ डे
पहिली ते आठवीच्या शाळा आठवडाभर हाफ डे असतील. त्यानंतर आढावा घेऊन पुढचा निर्णय घेऊ. तसेच शाळेत विद्यार्थ्यांना पाठवणं बंधनकारक नाही. ते पालकांवर अवलंबून आहे. आम्ही पालकांना जबरदस्ती करणार नाही, असंही अजित पवारांनी सांगितलं होतं.
धुळ्यात आजपासून शाळा सुरु
इतर बातम्या:
IND vs WI: रोहित बरोबरची मैत्री विसरणार, पुढचं लक्ष्य भारत, कायरन पोलार्डची गर्जना
Pune School Reopen as per orders of Ajit Pawar and Maharashtra Government school will restart form tomorrow