Solapur : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा अर्थसंकल्प नामंजूर, शिक्षण क्षेत्रातील दुर्मिळ घटना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे बजेट सिनेट सदस्यांनी बहुमताने फेटाळले. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातील दुर्मिळ घटना आज घडलीय.

Solapur : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा अर्थसंकल्प नामंजूर, शिक्षण क्षेत्रातील दुर्मिळ घटना
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठImage Credit source: Tv9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 9:56 PM

सोलापूर : महाराष्ट्राच्या (Maharashtra) शैक्षणिक क्षेत्रात दुर्मिळ घटना घडलीय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर (Solapur) विद्यापीठाचे बजेट सिनेट सदस्यांनी बहुमताने फेटाळले गेलं आहे. बजेटवर अनेक सदस्यांना आक्षेप होता त्यामुळे विद्यापीठच्या अधिसभेच्या सदस्यांनी बजेटविरोधात मतदान केले. बजेटच्या (Budget) विरोधात 22 सदस्यांनी तर बजेटच्या बाजूने 11 सदस्यांनी मतदान केले तर 3 सदस्य तटस्थ राहिले. मागील अनेक दिवसापासून विविध प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने सिनेट सदस्यांनी विरोधात मतदान केले. दरम्यान हे बजेट फेटाळले असले तरी ते विद्यापीठाचे कुलपती आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे हे अंदाजपत्रक मंजुरीसाठी पाठवलं जाणार असल्याची माहिती मिळतेय. तर, कुलुगरुंनी बजेट मंजूर करुन घेण्यात अपयश आल्यानं राजीनामा द्यावा, अशी मागणी बजेट विरोधात मतदान करणाऱ्या सिनेट सदस्यांनी केली आहे.

राजकारणासाठी बजेट विरोधात मतदान

काही सदस्यांनी यात राजकारण आणून केवळ विरोधासाठी विरोध म्हणून अंदाजपत्रकाच्या विरोधात मत नोंदविले, असल्याची माहिती प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार यांनी दिली. दरम्यान हे बजेट फेटाळले असले तरी ते विद्यापीठाचे कुलपती आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे हे अंदाजपत्रक मंजुरीसाठी पाठवलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

कुलगुरुंनी राजीनामा द्यावा, सिनेट सदस्यांची मागणी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आज जे बजेट सादर करण्यात आलं ते नामंजूर करण्यात आलं त्यांच्या मागे अनेक गोष्टी होत्या. विद्यापीठाच्या कुलगुरु इतक्या दिवसांपासून कुणाचं ऐकत नव्हत्या, बोलवत नव्हत्या. त्यामुळं त्यांच्यासोबत कसं काम करायचं,अशी आमची भावना होती. बजेटमध्ये देखील काही गोष्टी होत्या. 35 रुपयांचा विषय असेल, गाड्या खरेदीचा विषय असेल तो व्यवस्थापन परिषदेसमोर यायला पाहिजे होत्या. विद्यापीठ फंडाचा खर्च आता संपत आला आहे. राज्यपाल आले होते तेव्हा आम्हाला बोलवण्यात आलं नाही. नॅक कमिटी आली तेव्हा आम्हाला बोलावण्यात आलं नाही. पदवीदान समारंभ झाला तेव्हा आम्हाला ऑनलाईन उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं. आम्हाला साधी एक लिंक तयार करुन देण्यात आली नाही. यूट्यूबवर कार्यक्रम पाहायला सांगण्यात आलं. कुलगुरुंविरोधातील रोष आजच्या निर्णयातून व्यक्त झाला. व्यवस्थापन परिषदेत आम्ही काही सांगायला गेलो तरी त्या आमचं ऐकायला तयार नसतात, असं देखील व्यवस्थापन परिषद सदस्या अश्विनी चव्हाण यांनी सांगितलं आहे.

बजेट चुकीचं असल्याचा सिनेट सदस्यांचा दावा

सिनेट सदस्यांनी जे बजेट देण्यात आलं त्यावर वित्त व लेखाधिकारी यांची सही नव्हती. विद्यापीठाच्या कुलगुरू मृणालिनी फडणवीस जे मनमानी पद्धतीनं कामकाज केलं. ते कामकाज सर्वांसमोर यावं म्हणून सिनेट सदस्यांनी बजेट विरोधात मतदान केलं. राजकारण कोणत्याही प्रकारचं आणलं नाही. राज्यातील एका जिल्ह्यापुरतं असलेलं विद्यापीठ आहे. या ठिकाणी अनेक बेकायदेशीर कामं केलं आहे. एका पेपरला 35 रुपयांप्रमाणं टेंडर देता हे विद्यार्थ्यांची पिळवणूक नाही का, असा सवाल सिनेट सदस्य राजाभाऊ सरवदे यांनी केला आहे.

इतर बातम्या:

उल्हासनगरमध्ये कमी क्षेत्रफळात क्लस्टर योजना राबविण्याचा विचार, दंड कमी करण्याबाबतही सरकार सकारात्मक

Congress : पराभवानंतर काँग्रेस ॲक्शन मोडवर, सोनिया गांधींचे 5 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्याचे आदेश

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.