NEET 2021 Exam:नीट परीक्षा किती वेळा होणार? केंद्रीय शिक्षणमंत्री स्पष्टचं बोलले…

नीट परीक्षा वर्षातून अधिक वेळा घेण्यात यावी, अशी चर्चा सुरु झाली होती. शिक्षणमंत्र्यांनी त्यावर पडदा टाकला आहे. Ramesh Pokhariyal NEET exam

NEET 2021 Exam:नीट परीक्षा किती वेळा होणार? केंद्रीय शिक्षणमंत्री स्पष्टचं बोलले...
रमेश पोखरियाल निशंक
Follow us
| Updated on: Mar 16, 2021 | 11:20 AM

NEET Exam 2021 नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी नीट परीक्षा वर्षातून एकदाच आयोजित केली जाईल, असं स्पष्ट केलं आहे. नीट परीक्षा म्हणजे राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा यंदा 1 ऑगस्टला होणार आहे. नीट परीक्षा वर्षातून अधिक वेळा घेण्यात यावी, अशी चर्चा सुरु झाली होती. शिक्षणमंत्र्यांनी त्यावर पडदा टाकला आहे. 2021 या वर्षामध्ये नीट परीक्षा एकदाच आयोजित केली जाईल, असं पोखरियाल यांनी स्पष्ट केले. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून नीट परीक्षेची तयारी करण्यात येत आहे. नीट परीक्षेची(NEET 2021 Exam Date)तारीख जाहीर झाली असून विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी एनटीएच्या वेबसाईटला भेट द्यावी, असं सांगितलं जात आहे. (Ramesh Pokhariyal Nishank said NEET exam in 2021 will conducted once check details of exam)

नीट परीक्षा 1 ऑगस्टला

राष्ट्रीय पात्रता किंवा प्रवेश चाचणी किंवा एनईईटी(NEET) 2021 परीक्षा 1 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आपल्या अधिकृत वेबसाईट nta.ac.in वर एमबीबीएस प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. परीक्षेसाठी अर्ज लवकरच सुरू होईल. एमबीबीएस / बीडीएस कोर्समध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी प्रवेश पोर्टल ntaneet.nic.in वर नोंदणी करावी लागेल.

11 प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा

या वर्षीपासून नीट युजी परीक्षा 11 प्रादेशिक भाषांमध्ये आयोजित केली जाणार आहे. यात इंग्रजा, दिंदी, आसामी, गुजराती, बंगाली, मराठी, ओडिया, कन्नड, तामिळ, तेलगू आणि उर्दू आदि भाषांचा समावेश असेल.

उच्च शिक्षण विभागाच्या सचिवांचा अधिक परीक्षांचा प्रस्ताव

उच्च शिक्षण विभागाचे सचिव अमित खरे यांनी NEET परीक्षा वर्षभरात अधिकवेळा आयोजित केली गेली पाहिजे, असं म्हटलं होतं. काही विद्यार्थी अडचणींमुळे परीक्षेवर लक्ष केंद्रीत करता येत नाही. विद्यार्थ्यांचं त्यामुळे वर्ष वाया जाते. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये आणि त्यांना संधी मिळावी यासाठी वर्षभरात परीक्षा अधिक वेळा झाली पाहिजे. एका वर्षात अधिक वेळा परीक्षा घेण्यासाठी ऑफलाईन पद्धतीऐवजी ऑनलाईन पद्धतीचा वापर करावा, असं अमित खरे म्हणाले.

NEET परीक्षा अधिक वेळा घेण्यासाठी त्यासंबंधित घटकांशी चर्चा करण्याची गरज असल्याचं अमित खरे म्हणाले. JEE आणि NEET परीक्षांमध्ये फरक आहे. JEE परीक्षा सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी आयोजित करण्याची गरज नसते. मात्र, NEET परीक्षा सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश करण्यासाठी अनिवार्य आहे. अमित खरेंनी सांगतिलं की विज्ञान विषयातील विद्यार्थ्यांना कॉमप्युटर हाताळण्यामध्ये सुलभता येण्यासाठी सात आठ महिने अगोदर त्याबाबत घोषणा करणं गरजेचे आहे.

संबंधित बातम्या:

एसएससी सीएचएसएल परीक्षा 12 एप्रिलपासून, 30 दिवसांच्या क्रॅश कोर्ससह होईल तयारी पक्की

UGC NET 2021 : युजीसी नेट परीक्षा अर्जाची करेक्शन विंडो खुली, या तारखेपर्यंत करु शकता दुरुस्ती

(Ramesh Pokhariyal Nishank said NEET exam in 2021 will conducted once check details of exam)

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.