Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रणजितसिंह डिसले रजा प्रकरणामुळं राजीनामा देण्याच्या मनस्थितीत; राजीनामा देणारा व्यक्ती आधी सांगत नाही: शिक्षणाधिकारी

ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) आणि उस्मानाबाद राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असून डिसले यांनी याबाबत टीव्ही 9 ला स्वतः माहिती दिली आहे.

रणजितसिंह डिसले रजा प्रकरणामुळं राजीनामा देण्याच्या मनस्थितीत; राजीनामा देणारा व्यक्ती आधी सांगत नाही: शिक्षणाधिकारी
रणजितसिंह डिसले किरण लोहार
Follow us
| Updated on: Jan 22, 2022 | 11:44 AM

संतोष जाधव/भूषण पाटील, टीव्ही 9 मराठी,  उस्मानाबाद / कोल्हापूर : ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) आणि उस्मानाबाद राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असून डिसले यांनी याबाबत टीव्ही 9 ला स्वतः माहिती दिली आहे. रणजितसिंह डिसले आणि आणि प्रशासनातील वाद आणखी पेटणार असल्याचं चित्र आहे. शिक्षणाधिकारी किरण लोहार (Kiran Lohar) यांनी प्रतिनियुक्तीवर गैरहजर असलेल्या डिसले गुरुजींनी जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा कसा उंचावला? त्यांनी फक्त अर्ज केला आहे त्या सोबतची कागदपत्रे नव्हती. परवानगी साठी ते थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे गेले.योग्य प्रस्ताव आल्यास रजा द्यायला काही अडचण नाही, अशी भूमिका देखील शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी म्हटलं आहे. याशिवाय राजीनामा द्यायचं कारण काय? राजीनामा देणारा माणूस आधीच सांगत नाही, असं देखील किरण लोहार म्हणाले आहेत.

रणजितसिंह डिसले नेमकं काय म्हणाले?

ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असून डिसले यांनी याबाबत टीव्ही 9 ला स्वतः माहिती दिली आहे. अमेरिकेत शिष्यवृत्ती मिळाली असून त्यासाठी त्यांना तेथे जाण्यासाठी डिसले यांना रजा हवी आहे. मात्र, शिक्षण विभागाकडे अर्ज करूनही रजा मंजूर होत नसल्याने डिसले गुरुजी वैतागले आहेत. शिक्षक म्हणून काम करणार मात्र जिल्हा परिषद शिक्षक नौकरीचा राजीनामा देण्याची मनस्थिती आहे. शिक्षण विभाग व प्रशासकीय व्यवस्था त्रास देत असल्याने व्यथित झाल्याने लवकरच निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले.

युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राइज सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी शाळेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना जाहीर झाला आहे. तब्बल सात कोटी रक्कमेचा पुरस्कार मिळवणारे डिसले हे पहिले भारतीय शिक्षक असून जगभरातील 140 देशांतील 12 हजारांपेक्षा अधिक शिक्षकांच्या नामांकनातून डिसले गुरुजींची निवड करण्यात आली आहे.

किरण लोहार नेमकं काय म्हणाले?

प्रतिनियुक्तीवर गैरहजर असलेल्या डिसले गुरुजींनी जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा कसा उंचावला, असा सवाल शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी केला.डिसले यांनी फक्त अर्ज केला आहे त्या सोबतची कागदपत्रे नव्हती. परवानगी साठी ते थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे गेले. योग्य प्रस्ताव आल्यास रजा द्यायला काही अडचण नाही, असंही किरण लोहार म्हणाले. आपण योग्य कागदपत्रे जोडायची नाहीत आणि रजा मंजूर झाली नाही म्हणायचं याला काय अर्थ असा सवाल देखील लोहार यांनी केला.

टीका होते म्हणून रजा मंजूर करावी असं नाही

रणजितसिंह डिसले डायट प्रतिनियुक्तीवर असताना ते त्या ठिकाणी 3 वर्ष हजर राहिले नाहीत. पाच सदस्यीय समितीने तसा अहवाल दिला आहे. चौकशीतील तथ्य आम्ही प्रशासना समोर मांडले जिल्हा परिषद प्रशासन योग्य निर्णय घेईल. माझ्यावर टीका होते म्हणून मी रजा मंजूर करावी असा होत नाही, असं किरण लोहार म्हणाले. राजीनामा द्यायचं कारण काय? राजीनामा देणारा माणूस आधीच सांगत नाही, असं देखील किरण लोहार म्हणाले.

इतर बातम्या:

डिसले गुरुजींना पीएचडीसाठी अमेरिकेत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न? जाणून घ्या गुरुजी आणि प्रशासनाची बाजू

CHYD : ‘हे कोडं तुमच्या ‘कोड’मुळे सुटू द्यात…’ पत्र ऐकून डिसले गुरुजींच्या डोळ्यात पाणी तरळलं…!

Ranjitsinh Disale said he think about resignation from job Kiran Lohar aslo gave answer to Disale

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल.
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान.
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती.
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका.
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'.
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'.
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.