Maharashtra SSC Result 2021: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेणार; 19 जुलैपासून ऑनलाईन नोंदणी

इयत्ता दहावीचा निकाल लागल्यानंतर आता लगेचच इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची लगबग सुरू होणार आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार आता अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार आहे. (FYJC Admission)

Maharashtra SSC Result 2021: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेणार; 19 जुलैपासून ऑनलाईन नोंदणी
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jul 17, 2021 | 7:47 AM

पुणे: इयत्ता दहावीचा निकाल लागल्यानंतर आता लगेचच इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची लगबग सुरू होणार आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार आता अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार आहे. त्यासाठी येत्या 19 जुलैपासून ऑनलाईन नोंदणीस सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली. (Registration for Maharashtra FYJC CET to open on Monday, says dinkar patil)

अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षा ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. 19 जुलैपासून सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांना त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. दरवर्षी दहावीतील गुणांच्या आधारे अकरावीची प्रवेश प्रक्रिया होते. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी वेगळे शुल्क आकारले जाणार नाही. तसेच विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यायची आहे की नाही एवढेच संकेतस्थळावर जाऊन स्पष्ट करायचे आहे, असंही पाटील यांनी सांगितलं.

अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया कशी असेल?

>> अकरावीची प्रवेशासाठी CET परीक्षा

>> इयत्ता 11 वी प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) CET परीक्षा

>> प्रवेश परीक्षेत राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न

>> गुण – 100

>> बहुपर्यायी प्रश्न

>> परीक्षा OMR पद्धतीने

>> परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी

>> कॉलेजमध्ये प्रवेशाचे निकष काय?

>> CET परीक्षेच्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार महाविद्यालयांमध्ये प्रवेश

>> CET परीक्षा देणाऱ्यांना 11 वी प्रवेशप्रक्रियेत प्राधान्य

>> त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश

>> CET परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन इयत्ता 10 वीच्या पद्धतीनुसार

दहावीचा निकाल 99.95 टक्के

यंदा इयत्ता दहावीचा निकाल 99.95 टक्के लागला आहे. तर यामध्ये तब्बल 957 विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 टक्के गुण मिळाले आहेत. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी 5 टक्के जास्त विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. तर 83 हजार 962 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. यंदाही कोकण विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे. कोकणात 31 हजार 168 विद्यार्थ्यांपैकी सर्वच विद्यार्थी परीक्षेत पास झाले आहेत. त्यामुळे विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर सर्वाधिक कमी निकाल नागपूर विभागाचा म्हणजे 99.84 टक्के लागला आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल 99.96% असून विद्यार्थ्यांचा निकाल 99.94% आहे. म्हणजेच विद्यार्थीनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा 0.02% ने जास्त आहे.दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 97.84% लागला आहे.

साडे सोळा लाख विद्यार्थी परीक्षेला बसले

यंदा दहावीच्या परीक्षेला 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थी बसल्याची नोंद झाली होती. यापैकी 9 लाख 09 हजार 931 मुलं असून मुलींची संख्या 7 लाख 48 हजार 693 एवढी आहे. या विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या 9 विभागीय शिक्षण मंडळांमार्फत सन 2021 मध्ये इ. 10 वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण जाहीर करण्यात आले आहेत. (Registration for Maharashtra FYJC CET to open on Monday, says dinkar patil)

संबंधित बातम्या:

Maharashtra SSC Result 2021 Toppers : यंदा तर रेकॉर्डच मोडला ब्वा पोरांनी…, तब्बल एवढ्या विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 टक्के!

Maharashtra SSC Result 2021 Declared : दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 99. 95 टक्के

Maharashtra SSC Result 2021 Declared LIVE Updates: दहावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत बेवसाईट http://result.mh-ssc.ac.in/ आणि https://mahahsscboard.in/ ला भेट द्या

(Registration for Maharashtra FYJC CET to open on Monday, says dinkar patil)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.