अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षेची नोंदणी सुरु; जाणून घ्या कधी होणार परीक्षा?

महाराष्ट्रात दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर सीईटी परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. यावर्षी प्रथमच नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अकरावी सीईटी प्रवेश परीक्षा द्यावी लागेल.

अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षेची नोंदणी सुरु; जाणून घ्या कधी होणार परीक्षा?
एमएचटी सीईटी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर
Follow us
| Updated on: Jul 20, 2021 | 3:34 PM

Maharashtra FYJC CET 2021 : महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आता अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेची नोंदणी (महाराष्ट्र एफवायजेसी सीईटी 2021) आजपासून सुरू झाली आहे. नोंदणीसंदर्भात सविस्तर कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला आहे. सीईटी परीक्षेची नोंदणी व परीक्षेची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. (Registration of CET exam for 11th admission started; Know when the exam will be)

महाराष्ट्रात दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर सीईटी परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. यावर्षी प्रथमच नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अकरावी सीईटी प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. सीईटी परीक्षेत चांगले गुण मिळाल्यानंतरच एका चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल. महाराष्ट्रात यावर्षी प्रथमच दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यांकनातून जाहीर करण्यात आला आहे. सीईटी (Maharashtra FYJC CET 2021) नोंदणी सुरू झाल्यानंतर उमेदवार अधिकृत वेबसाइट- cet.mh-ssc.ac.in आणि mahahsscboard.in वर लॉगइन करून अर्ज करू शकतात.

एफवायजेसी सीईटी 2021 ही ऐच्छिक परीक्षा

यावर्षी एमएसबीएसएचएसईतर्फे अकरावीच्या प्रवेशाच्या हेतूने विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा सरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार घेतली जात आहे, परंतु ती केवळ विद्यार्थ्यांसाठी पर्यायी अर्थात ऐच्छिक परीक्षा असणार आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला ही परीक्षा द्यायची असेल तर ते विद्यार्थी परीक्षेला बसू शकतील. परीक्षेला बसण्याची कुणावरही सक्ती नाही. मात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे नामांकित महाविद्यालय मिळवयाचे असेल तर ते विद्यार्थी अकरावी सीईटी परीक्षेत चांगले गुण मिळवून त्यांच्या आवडीच्या नामांकित महाविद्यालयात प्रवेशाचा मार्ग सुकर करू शकतील.

परीक्षेचा तपशील

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितले की, एफवायजेसी सीईटी 2021 यंदा 21 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात येईल. 20 जुलै रोजी अर्थात आज परीक्षा फॉर्म जाहीर केला जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले आहे. अर्जाची लिंक अधिकृत संकेतस्थळावर जारी केली जाणार आहे. राज्य मंडळाशी संबंधित सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी सीईटी लागू असेल आणि शिक्षण आयुक्तांच्या देखरेखीखाली बोर्ड किंवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत ही परीक्षा घेण्यात येईल.

यावर्षीचा दहावीचा निकाल

– यंदाच्या दहावीच्या परीक्षेत राज्यभरात 957 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले आहेत. – 90% पेक्षा जास्त टक्के मिळवणारे 1,04,633 विद्यार्थी आहेत. – 1,28,174 विद्यार्थ्यांनी 85 ते 90 टक्क्यांच्या दरम्यान गुण मिळवले आहेत. – तसेच 80 ते 95 टक्क्यांच्या दरम्यान गुण मिळवणारे 1,85,542 विद्यार्थी आहेत. (Registration of CET exam for 11th admission started; Know when the exam will be)

इतर बातम्या

फोन टॅपिंग मोदींच्या नव्हे, मनमोहन सिंग यांच्या काळात, देवेंद्र फडणवीसांचा दावा

विराटला निवृत्तीनंतर मिळणारी ‘ही’ गोष्ट आताच मिळाली, कोहलीबाबत युवराज सिंगने केलं मोठ वक्तव्य

Non Stop LIVE Update
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.