SET Exam: सेट परीक्षेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सज्ज, 220 केंद्रांवर परीक्षा, प्रवेशपत्र जाहीर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणारी सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा रविवार 26 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात येत आहे.

SET Exam: सेट परीक्षेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सज्ज, 220 केंद्रांवर परीक्षा, प्रवेशपत्र जाहीर
SPPU SET Exam
Follow us
| Updated on: Sep 24, 2021 | 11:09 AM

SET Exam पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणारी सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा रविवार 26 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात येत आहे. ही परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली व पणजी (गोवा) या केंद्रावर घेण्यात येईल. रविवारी राज्यातील 220 महाविद्यालयातील परीक्षा केंद्रात ही परीक्षा होईल. परीक्षेसाठी 98 हजार 360 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. तर, पुण्यात 15 हजार 623 विद्यार्थ्यांनी पुणे शहराची परीक्षा केंद्र म्हणून निवड केली आहे. सहायक प्राध्यापक पदासाठीच्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा म्हणजेच सेट परीक्षेचे प्रवेशपत्र जारी करण्यात आलं आहे. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र https://setexam.unipune.ac.in या वेबसाईटवर उपलब्ध होईल.

सेट परीक्षेचं प्रवेशपत्र डाऊनलोड कसं करायचं?

स्टेप 1: अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी प्रथम setexam.unipune.ac.in या वेबसाईटला भेट द्यावी स्टेप 2 : होमपेजवरील डाऊनलोड अ‌ॅडमिट कार्ड बाय लॉगिन अ‌ॅप्लिकेश नंबर स्टुडंट नेम या पर्यायावर क्लिक करा स्टेप 3 : नवीन विंडो होमपेजवर ओपन होईल, तिथं विद्यार्थ्यांनी लॉगिन डिटेल्स भराव्यात स्टेप 4 : यानंतर प्रवेशपत्र दिसेल ते डाऊनलोड करुन त्यांची प्रिंट आऊट सोबत ठेवावी

कोरोना नियमांचं पालन करत परीक्षा

सेट परीक्षेसाठी अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार त्यांना परीक्षाकेंद्र देण्यात आली आहेत. ही परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली व पणजी (गोवा) या केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षेचं आयोजन करताना कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना मास्क घालावा लागेल. याशिवाय फिजिकल डिस्टन्सिंगचं पालनं करावं लागेल, सॅनिटायझर देखील वापरावा लागेल.

किती परीक्षार्थींची नोंदणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्यावतीनं आयोजित करण्यात येणाऱ्या 37 व्या सेट परीक्षेसाठी 98360 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सेट विभागाकडून विद्यार्थ्यांच्या नावाची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं होत असून ओएमआर उत्तरपत्रिकेवर उत्तर नोंदवावी लागणार आहेत. सेट विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर नमुना उत्तर पत्रिका पाहायला मिळेल.

परीक्षेचं स्वरुप

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून घेण्यात येणारी 37 वी सेट परीक्षेसाठी दोन पेपर निश्चित करण्यात आले आहेत. पहिल्या पेपरमध्ये अध्ययय अध्यापन कौशल्य, संशोधन क्षमता, तार्किक क्षमता, सामान्य ज्ञान यासंबंधी प्रश्न विचारले जातील. दुसऱ्या पेपरमध्ये संबंधित विषयासंबंधी प्रश्न विचारले जातील.

इतर बातम्या:

FYJC Admission : अकरावी प्रवेशाच्या तीन फेऱ्या पूर्ण, विशेष फेरीअंतर्गत प्रवेश ‘या’ तारखेपर्यंत सुरु राहणार, वर्षा गायकवाड यांचं ट्विट

उज्ज्वला गॅस योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ, अमित शाहांच्या हस्ते उद्घाटन, मोफत गॅस कसा मिळवाल?

Savitribai Phule Pune University will conduct Maharashtra SET on 26 September 2021 check details on setexam.unipune.ac.in

Non Stop LIVE Update
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.