कधी वडीलांसोबत शेती करायचा, हिंदी माध्यमातून परीक्षा देऊन बनला IAS
आपल्या वडीलांना शेतीत मदत करणारा रवि कुमार सिहाग याने हिंदी माध्यमाला अडसर न मानता केवळ मेहनतीच्या जोरावर युपीएससी चौथ्या प्रयत्नात उत्तीर्ण केली आहे.
नवी दिल्ली | 2 ऑक्टोबर 2023 : देशातील लाखो तरुण दरवर्षी युपीएससीच्या सिव्हील परीक्षेची तयारी करीत असतात. परंतू या अवघड परीक्षेत उत्तीर्ण होणे सोपे नसते. हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अडचणी असतात. युपीएससी उत्तीर्ण होणे अवघड असते. कारण सर्व पुस्तके ही इंग्रजी भाषेत आहेत. त्यामुळे हिंदी माध्यमातील विद्यार्थ्यांना अभ्यास करताना दुप्पट अभ्यास करावा लागतो. परंतू मेहनत करणाऱ्यांना कोणीही अडवू शकत नाही. अशाच एका तरुणाने हिंदी माध्यमातून असूनही युपीएससीत यश मिळविले आहे.
वडीलांसोबत शेतीची कामे केली
युपीएससी परीक्षेत 18 वी रॅंक मिळविणाऱ्या रवि कुमार सिहाग याची कहाणी अनोखी आहे. रवि मूळचे राजस्थानच्या श्री गंगानगर जिल्ह्यातील रहीवासी आहेत. त्यांचे वडील शेतकरी आहेत. रवि देखील शेतात वडीलांची मदत करायचे. रवि यांनी सातवीपर्यंतचे शिक्षण वडीलांच्या गावातील सरस्वती विद्यामंदिर येथून घेतले. त्यानंतर 11 वी अनूपगढ येथील शारदा स्कूल आणि 12 वी विजयनगरच्या एका सेकंडरी स्कूलमधून केले. त्यानंतर अनूपगढ येथील शारदा महाविद्यालयातून ते बी.ए. झाले.
हिंदी माध्यमातील टॉपर बनले
रवि यांनी चार वेळा युपीएससीची सिव्हील परीक्षा दिली होती. ज्यात तीन वेळा ते अयशस्वी झाले होते. साल 2018 युपीएससीत पहिल्या प्रयत्नात त्यांना 337 वी आणि साल 2019 मध्ये 317 वी रॅंक मिळविली होती. साल 2020 मध्ये तिसऱ्या प्रयत्नात त्यांना मुख्य परीक्षा पास करता आली नाही. त्यानंतर चौथ्या प्रयत्नात साल 2021मध्ये त्यांना 18 वी रॅंक मिळाली.ते युपीएससी परीक्षा 2021 मध्ये हिंदी माध्यमातील टॉपर बनले.
हिंदीसोबत इंग्रजीचा अभ्यास करा
रवि आपल्या यशात भाषेला कोणत्या स्वरुपात बाधा मानत नाहीत. जर योग्य दिशेने प्रयत्न केला तर या परीक्षेला कोणत्याही भाषेत उत्तीर्ण होता येईल असे त्यांचे मत आहे. ते हिंदी भाषे सोबत इंग्रजी भाषेला वाचण्याचा सल्ला देतात. कारण कामकाजाची आणि अन्य ठिकाणी इंग्रजीचे महत्व नाकारु शकत नाही असे त्यांनी म्हटले आहे.