राजर्षी शाहू महाराजांचा वारसा जपला, ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणलं, शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेबद्दल जाणून घ्या

शिवाजी विद्यापीठाचा आज वर्धापन दिवस आहे. विद्यापीठाची स्थापना 18 नोव्हेंबर 1962 रोजी झाली होती.

राजर्षी शाहू महाराजांचा वारसा जपला, ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणलं, शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेबद्दल जाणून घ्या
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
Follow us
| Updated on: Nov 18, 2021 | 6:14 PM

कोल्हापूर: महाराष्ट्राला समृद्ध शैक्षणिक वारसा आणि पंरपरा लाभलेली आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांच्या संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं होतं. तोच वारसा शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर पुढं चालवत आहे. शिवाजी विद्यापीठाचा आज वर्धापन दिवस आहे. विद्यापीठाची स्थापना 18 नोव्हेंबर 1962 रोजी झाली होती. दक्षिण महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेत यशाची शिखरं पादाक्रांत केली आहेत.

श्रीमंत राजाराम छत्रपती आणि डॉ.बाळकृष्ण यांची संकल्पना

शिवाजी विद्यापीठाची संकल्पना कोल्हापूरचे संस्थानचे श्रीमंत राजाराम छत्रपती आणि राजाराम कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य डॉ. बाळकृष्ण यांनी मांडली. कोल्हापूरमध्ये विद्यापीठ व्हावं यासाठी बाळासाहेब देसाई यांनी देखील विशेष प्रयत्न केले.कोल्हापूरच्या स्थानिक नागरिकांचं देखील विद्यापीठ स्थापनेत महत्त्वाचं आणि बहुमोल योगदान आहे. 18 नोव्हेंबर 1962 ला ज्ञानमेवामृतम या बोधवाक्यापासून सुरु झालेला विद्यापीठाचा प्रवास आजही सुरु आहे. तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन, महाराष्ट्राचे त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई देखील विद्यापीठ कोनशिला अनावरण कार्यक्रमाला उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेच्या वेळी आप्पासाहेब पवार हे कुलगुरु होते. सुरुवातीला कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सोलापूर जिल्हा हे विद्यापीठाचं कार्यक्षेत्र होतं. नंतरच्या काळात रत्नागिरी जिल्हा मुंबई विद्यापीठाशी संलग्न करण्यात आला तर सोलापूरमध्ये नवीन विद्यापीठाची उभारणी करण्यात आली.

आप्पासाहेब पवार शिवाजी विद्यापीठाचे शिल्पकार

महाराष्ट्र सरकारनं शिवाजी विद्यापीठाची स्थापना केल्यानंतर पहिले कुलगुरु म्हणून डॉ. आप्पासाहेब पवार यांची नियुक्ती केली होती. ते 1962 ते 1975 या काळाता विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून कार्यरत होते. या कालावधीत त्यांनी विद्यापीठ उभारणीचं आव्हान य़शस्वीरित्या पार पाडलं. नवीन विद्यापीठाच्या परिसराचा विकास, विद्यापीठ प्रशासन, आर्थिक नियोजन यामुळं विद्यापीठानं नावलौकिक मिळवला. आप्पासाहेब पवार यांच्या विद्यापीठ उभारणीतील योगदानामुळं त्यांना शिवाजी विद्यापीठाचे शिल्पकार म्हटलं जातं. प्रसिद्ध इतिहास संशोधक म्हणून त्यांची ओळख होती.

सध्या तीन जिल्ह्यात कार्यक्षेत्र

शिवाजी विद्यापीठाचं कार्यक्षेत्र सध्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्हा इतकं आहे. 280 संलग्नित महाविद्यालय आणि विद्यापीठातील विभाग यासह जवळपास तीन लाख विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचं काम विद्यापीठाकडून करण्यात येतंय.दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम विद्यापीठाकडून सुरु आहे. कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के यांच्या नेतृत्त्वात विद्यापीठाचं उच्च शिक्षण क्षेत्रात सध्या जोरदार काम सुरु आहे. शिवाजी विद्यापीठाचा परिसर 853 एकर इतका आहे.

इतर बातम्या:

Shivaji University | शिवाजी विद्यापीठाला नॅककडून ए प्लस प्लस मानांकन, कुलगुरुंची माहिती

Kolhapur Corona Care | कोल्हापूर | शिवाजी विद्यापीठाच्या वसतिगृहात कोविड केअर सेंटर

महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.