Solapur University: M.A उर्दू भाषाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित विद्यार्थ्यांच्या हातात, सोलापूर विद्यापीठातील सावळा गोंधळ!

या संदर्भात सोलापूर विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक शिवकुमार गणापुर यांनी माहिती दिली. एम ए उर्दू विषयाच्या विद्यार्थ्यांना प्रश्न पत्रिकेखाली असलेल्या एमसीक्यू उत्तराखाली खुणा करुन हस्तलिखित प्रश्नपत्रिका दिल्याची प्रश्नपत्रिका व्हायरल झाली आहे.

Solapur University: M.A उर्दू भाषाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित विद्यार्थ्यांच्या हातात, सोलापूर विद्यापीठातील सावळा गोंधळ!
Solapur Exam
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 2:44 PM

सोलापूर: सोलापूर विद्यापीठाच्या (Solapur University) परीक्षेचा सावळा गोंधळ समोर आलाय. सोलापूर विद्यापीठातील एम ए उर्दू भाषाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित विद्यार्थ्यांच्या हातात दिल्याचे प्रकरण समोर आलंय. सोलापूर विद्यापीठाकडून एम ए उर्दू भाषाची (MA Urdu Language) प्रश्नपत्रिका उत्तरासहित दिल्याचे उघड झालंय. दरम्यान या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आलीये. या संदर्भात सोलापूर विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक शिवकुमार गणापुर यांनी माहिती दिली. एम ए उर्दू विषयाच्या विद्यार्थ्यांना प्रश्न पत्रिकेखाली असलेल्या एमसीक्यू उत्तराखाली खुणा करुन हस्तलिखित प्रश्नपत्रिका दिल्याची प्रश्नपत्रिका व्हायरल (Question Paper Viral) झाली आहे. मागील महिन्यापासून सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षेवरून सावळा गोंधळ सुरूच आहे.

नेमकं काय घडलं?

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षेतील सावळा गोंधळ सुरूच आहे. या गोंधळाच्या मालिकेत एमए उर्दूची भर पडली. परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना चक्क हस्तलिखित आणि उत्तराच्या खुणा असलेली प्रश्नपत्रिका देण्यात आली. या विभागात एकूण वीस विद्यार्थी आहेत. हाताने लिहिलेली प्रश्नपत्रिका दिल्याने एकच गोंधळ उडालाय. पहिली-दुसरीतील विद्यार्थ्यांना सुद्धा आजकाल हाताने लिहिलेली प्रश्नपत्रिका देत नाहीत. हे तर विद्यापीठ आहे. परीक्षा विभागात यासाठी टायपिंग व्यवस्था असताना सुद्धा हा प्रकार घडलाय.

इतकंच काय तर विद्यापीठात प्रशपत्रिका टाईप करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ असते. यासाठी निधीही असतो. पण हस्तलिखित प्रश्नपत्रिका काढण्याचा हा प्रकार सोलापूर विद्यापीठाने रूढ करून टाकला. जशा एमएस्सी गणिताच्या प्रश्नपत्रिका हस्तलिखित होत्या. तशाच एमए उर्दूच्या प्रश्नपत्रिकाही हस्तलिखितच आहेत. गेल्या महिन्यातच असा प्रकार घडून आल्यानं हा आता प्रकार आता वारंवार होताना दिसून येतोय. हा गोंधळ विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी परीक्षेच्या दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेत घडलाय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.