Sri Lanka मोठ्या आर्थिक संकटात, कागदाच्या टंचाईनं परीक्षा लांबणीवर, 45 लाख विद्यार्थ्यांना फटका
श्रीलंका (Sri Lanka) सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असल्याचं चित्र आहे. श्रीलंकेकडील परकीय चलनाची (Currency) गंगाजळी घटल्यानं मोठ्या संकटाचा सामना करण्याची वेळ श्रीलंकन सरकार आणि नागरिकांवर आली आहे.
नवी दिल्ली: श्रीलंका (Sri Lanka) सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असल्याचं चित्र आहे. श्रीलंकेकडील परकीय चलनाची (Currency) गंगाजळी घटल्यानं मोठ्या संकटाचा सामना करण्याची वेळ श्रीलंकन सरकार आणि नागरिकांवर आली आहे. श्रीलंकेकडे असणारं परकीय चलन इंधन तेल आणि इतर कारणांवर खर्च करावं लागत असल्यानं देशातील परीक्षा (Exam) कागदाअभावी लांबणीवर टाकण्याची नामुष्की ओढावली आहे. यामुळं जवळपास 45 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढं गेल्या आहेत. प्रिंटिंगचा पेपर नसल्यानं प्रश्नपत्रिका आणि उत्तर पत्रिका छापता येत नाहीत. पेपर आयात करण्यासाठी परकीय चलन शिल्लक नसल्यानं परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण विभागानं सोमवार पासून सुरु होणाऱ्या सत्र परीक्षा अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकल्या गेल्या आहेत.
45 लाख विद्यार्थ्यांना प्रमोट करावं लागणार
श्रीलंकेत कागदाची टंचाई निर्माण झालीय. कागद खरेदीसाठी लागणारं परकीय चलन कमी प्रमाणात उपलब्ध आहे. श्रीलंका 1948 मध्ये स्वतंत्र झाल्यानंतर त्यांच्या पुढं हा पहिल्यांदा इतकी वाईट स्थिती निर्माण झाली आहे. श्रीलंकेतील पश्चिम प्रांताच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. परीक्षेसाठी कागद उपलब्ध न झाल्यास 45 लाख विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती आहे.
श्रीलंकेची चीनकडूनही निराशा
श्रीलंकेवर सध्या 6.9 अब्ज अमेरिकेनं डॉलरचं कर्ज आहे. ते कर्ज या वर्षी परतफेड करण्याची गरज आहे. तर, श्रीलंकेकडील परकीय चलन 2.3 अब्ज अमेरिकन डॉलर इतकं आहे. आर्थिक संकटामळं श्रीलंकेत किराणा माल, पेट्रोल डिझेल, दूध आणि साखर आणि तांदळाच्या खरेदीसाठी रांगा लागल्या होत्या. श्रीलंकेनं काही दिवसांपूर्वी चीनकडे मदतीसाठी विनंती केली होती. मात्र, श्रीलंकेच्या विनंतीला चीननं अद्याप प्रतिसाद दिला नसल्याची माहिती आहे.
इतर बातम्या:
स्पेनमध्ये Prabhasवर सर्जरी, शूटिंगदरम्यान झाली होती दुखापत; चाहते करतायत प्रार्थना
VIDEO : दारुच्या नशेत भान हरपलं अन् चाकू घेऊन नाचणं जीवावर बेतलं, मध्य प्रदेशातील धक्कादायक घटना