SSC HSC Supplementary Exam: पोरांनो 10वी 12वी पुरवणी परीक्षेचं हॉल तिकीट आजपासून मिळणार! आज सकाळी 10 वाजल्यापासून ऑनलाइन मिळणार हॉलतिकीट

SSC HSC Supplementary Exam: 21 जुलै ते 12 ऑगस्ट या दरम्यान होणार 12 वी ची पुरवणी परीक्षा होणारे तर 27 जुलै ते 12 ऑगस्ट या दरम्यान होणार दहावीची पुरवणी परीक्षा घेतली जाईल. परीक्षेचं हॉलतिकीट आज 10 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना मिळायला होणार सुरुवात !

SSC HSC Supplementary Exam: पोरांनो 10वी 12वी पुरवणी परीक्षेचं हॉल तिकीट आजपासून मिळणार! आज सकाळी 10 वाजल्यापासून ऑनलाइन मिळणार हॉलतिकीट
SSC HSC Supplementary ExamImage Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: Jul 09, 2022 | 9:20 AM

दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचं हॉलतिकीट (SSC HSC Supplementary Exam Hall Ticket) आजपासून मिळणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून हे हॉलतिकीट ऑनलाइन पद्धतीने (Online Hall Ticket) विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे. बोर्डाच्या परीक्षेत (Mahrashtra Board Exam)  विषय राहिलेल्या अपात्र विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा घेतली जाते त्यासाठीचं हे हॉल तिकीट आहे. 21 जुलै ते 12 ऑगस्ट या दरम्यान होणार 12 वी ची पुरवणी परीक्षा होणारे तर 27 जुलै ते 12 ऑगस्ट या दरम्यान होणार दहावीची पुरवणी परीक्षा घेतली जाईल. परीक्षेचं हॉलतिकीट आज 10 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना मिळायला होणार सुरुवात ! 

पुरवणी परीक्षा वेळापत्रक

महाराष्ट्र शिक्षण बोर्डाकडून जुलै-ऑगस्ट 2022 माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता दहावी आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षा वेळापत्रक नुकतंच जाहीर करण्यात आलं होतं. परीक्षेच्या अर्जात मुदतवाढ पण देण्यात आली होती. जुलै- ऑगस्ट 2022 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षेची लेखी परीक्षेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

  1. इयत्ता बारावी सर्वसाधारण आणि व्दिलक्षी विषयांची लेखी परीक्षा 21 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत होणार
  2. बारावी व्यवसाय अभ्यासक्रमांची परीक्षा 21 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होणार
  3. हे सुद्धा वाचा
  4. दहावीची पुरवणी परीक्षा 27 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत होणार
  5. दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 26 जुलै 2022 ते 8 ऑगस्ट 2022 या कालावधीत होणार
  6. बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 20 जुलै,2022 ते 8 ऑगस्ट 2022 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.

महत्त्वाचे

  • या कालावधीमध्ये होणाऱ्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंडळाची अधिकृत वेबसाइट www.mahahsscboard.in वर जाहीर करण्यात आले आहे.
  • ही वेळापत्रकाची सुविधा केवळ माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांत छापील स्वरूपात अंतिम वेळापत्रक मिळणार आहे.
  • त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि परीक्षेस बसावे असे आवाहन बोर्डाकडून करण्यात आले आहे.
  • अन्य वेबसाइटवरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेल्या वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.