CBSE Exams : कसं करायचं विद्यार्थ्यांनी ? अभ्यास करावा का प्रवास ? परीक्षा केंद्र बदलून द्या, विद्यार्थ्यांची मागणी
ऐन बोर्डाच्या परीक्षेत परीक्षा केंद्र लांब असल्यामुळे पालक त्रस्त झालेत. विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचं म्हणत पालक आता समस्येचं समाधान शोधण्यासाठी ठिकठिकाणचे दरवाजे ठोठावतायत.
मुंबई : मुंबईतील (Mumbai) अणुशक्तीनगरमध्ये असलेल्या अणुऊर्जा केंद्रीय शाळांमधून (AECS) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (CBSE) 10वी आणि 12वीची परीक्षा देणाऱ्या सुमारे 500 विद्यार्थ्यांना मालाडमधलं परीक्षा केंद्र 34 किलोमीटर लांब देण्यात आलंय. आता विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा कि प्रवासात वेळ घालवायचा असा प्रश्न उपस्थित होतोय. ऐन बोर्डाच्या परीक्षेत परीक्षा केंद्र लांब असल्यामुळे पालक त्रस्त झालेत. विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचं म्हणत पालक आता समस्येचं समाधान शोधण्यासाठी ठिकठिकाणचे दरवाजे ठोठावतायत.
अणुशक्तीनगरमध्ये एकूण 6 अणुऊर्जा केंद्रीय शाळा (AECS) आहेत. त्यातल्या 4 आणि 5 नंबर शाळांमधील विद्यार्थ्यांना ही परीक्षा केंद्र लांब असण्याची समस्या भेडसावतीये. ” सहसा CBSE बोर्डाच्या पेपरला मुलांना त्यांच्याच शाळेत परीक्षा केंद्र दिलं जात नाही. AECS च्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र देताना अणुशक्तीनगरमध्येच वेगळ्या शाळेत दिलं जातं. लांब म्हटलं तरी फार तर फार मानखुर्द मधल्या केंद्रीय विद्यालयांमध्ये हे परीक्षा केंद्र दिलं जातं पण या वर्षीचं नियोजन खूपच धक्कादायक आहे.” असं विद्यार्थ्यांचे पालक म्हणतात.
अशा परिस्थितीत परीक्षा केंद्र बदलून देणं अवघड
विद्यार्थ्यांना ॲडमिट कार्ड्स दिले गेलेत आणि बोर्डाचे पेपर सुद्धा परीक्षा केंद्रांवर पोहचले आहेत त्यामुळे अशा परिस्थितीत परीक्षा केंद्र बदलून देणं अवघड असल्याचं सीबीएसईचे रिजिनल डिरेक्टर महेश धर्माधिकारींचं म्हणणं आहे.
सीबीएसई सत्र 2 चे पेपर 26 एप्रिल 2022 ला सुरु होणार आहेत. पालक आणि विद्यार्थ्यांना ही समस्या भेडसावतीये. परीक्षा केंद्र बदलून मिळावं यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना मागणी देखील करण्यात आलीये. आता पालक आणि विद्यार्थी योग्य निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.
इतर बातम्या :