आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी जेईईचा अडथळा केला पार, चाैघांनी घेतली मोठी झेप
नुकताच जेईईचा निकाल जाहिर झालाय. या परीक्षेत गडचिरोलीच्या दुर्गम भागातील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळवले आहे. आता या विद्यार्थ्यांचे काैतुक केले जात आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नामध्ये हे यश मिळवले हे सर्वात जास्त विशेष बाब आहे.
गडचिरोली : गडचिरोली भागातील दुर्गम क्षेत्रात असलेल्या शासकीय आश्रम शाळा कोरची येथील विद्यार्थींनी मोठे यश मिळवले आहे. या विद्यार्थ्यांचे आता सर्वत्र काैतुक होताना देखील दिसतंय. या विद्यार्थ्यांनी नक्कीच गगण भरारी घेतलीये. जेईई परीक्षेत या विद्यार्थ्यांनी दणदणीत यश मिळवले आहे. थेट शासकीय आश्रम शाळेतील चार विद्यार्थी हे जेईई परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. कठोर मेहनत घेऊन विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे. या चार विद्यार्थ्यांचा आता भारतातील प्रसिद्ध आयआयटी संस्थामध्ये प्रवेश निश्चित झालाय.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा कोरची देखील विद्यार्थ्यांचे जोरदार काैतुक केले जातंय. आयआयटी व इतर अभियांत्रिकी संस्थामधील प्रवेशासाठी देशपातळीवर नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत मुख्य अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा घेतली जाते.
आता याच परीक्षेचा निकाल हा जाहिर करण्यात आलाय. या परीक्षेसाठी शासकीय आश्रम शाळेतून दहा विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये चार विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यात प्रेरणा सतिश राऊत, स्नेहल मोहनलाल कुमरे, राज मानसिंग कुमरे, सानिया विनायक किरंगे हे चार विद्यार्थी यशस्वीपणे झाले आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची जिद्द असेल तर अतिदुर्गम भागातील विद्यार्थी सुद्धा शहरातील विद्यार्थ्याबरोबर सरशी करु शकतात हेच या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. शासकीय आश्रम शाळा कोरची येथील विद्यार्थ्यांवर काैतुकांचा वर्षाव केला जातोय. या विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस मेहनत करून हे यश मिळवले आहे.
विशेष म्हणजे जेईई यासारख्या परीक्षेत या विद्यार्थ्यांना पहिल्याच प्रयत्नामध्ये यश मिळाले हे सर्वात विशेष आहे. जेईई ही परीक्षा संपूर्ण भारतामध्ये घेण्यात येते. या परीक्षेच्या माध्यमातून अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. वर्षभर विद्यार्थ्यांना या परीक्षेचा अभ्यास करावा लागतो. अनेकजण अशा परीक्षांसाठी खासगी शिकवणी देखील लावतात.