दहावी बारावी ऑफलाईन परीक्षांचा मार्ग मोकळा, सुप्रीम कोर्टानं विरोधी याचिका फेटाळली

सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) आज दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षांच्या (Class X and Class XII exam) विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळली आहे.

दहावी बारावी ऑफलाईन परीक्षांचा मार्ग मोकळा, सुप्रीम कोर्टानं विरोधी याचिका फेटाळली
Supreme court
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 2:48 PM

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) आज दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षांच्या (Class X and Class XII exam) विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळली आहे. सर्व राज्यांचे बोर्ड, सीबीएसई (CBSE) आणि आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली होती. न्यायमूर्ती ए एम खानविलकर, दिनेश माहेश्वरी आणि सीटी रविकुमार यांनी ही याचिका फेटाळली आहे. या याचिका या परीक्षांबद्दल चुकीची माहिती पसरवणाऱ्या असल्याचं देखीलन न्यायालयानं म्हटलं आहे. गेल्या वर्षी कोरोना विषाणू संसंर्ग झाल्यामुळं परीक्षा रद्द करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता., असं निरिक्षण देखील सुप्रीम कोर्टानं नोंदवलं आहे. त्यामुळं यंदाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विद्यार्थ्यांना आता आगामी काळात दहावी आणि बारावीच्या परीक्षांना सामोरं जावं लागलं आहे.

विद्यार्थ्यांना चुकीच्या आशा निर्माण होतात…

दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षा रद्द कराव्यात यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.ऑफलाईन परीक्षांना विरोध करणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टानं भाष्य केलं आहे.  परीक्षा रद्द करण्यासंदर्भातील याचिका या विद्यार्थ्यांमध्ये चुकीच्या आशा निर्माण करतात. न्यायालयांनी अशा प्रकारच्या याचिकांची दखल घेतल्यास यंत्रणांमध्ये संभ्रम निर्माण होतो. या कशा प्रकारच्या याचिका आहेत, असा सवाल देखील सुप्रीम कोर्टानं विचारला आहे. संबंधित यंत्रणांना निर्णय घेऊ द्या, असं मत देखील  सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलं आहे.

महाराष्ट्रातील बारावीच्या लेखी आणि प्रात्याक्षिक परीक्षा कधी?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून बारावीच्या परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च या कालावधीत घेण्यात येतील. प्रात्याक्षिक परीक्षा, श्रेणी परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च मध्ये होतील. कोरोना आणि इतर कारणामुळं अडचण आल्यास 31 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा होतील.

दहावीच्या लेखी आणि प्रात्याक्षिक परीक्षा

दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत घेण्यात येणार आहेत. प्रात्याक्षिक, तोडी परीक्षा 25 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत परीक्षा होईल. काही कारणामुळं प्रात्याक्षिक परीक्षा देता आली नाही तर 5 एप्रिल ते 22 एप्रिल पर्यंत होतील. मंडळाच्या परीक्षा ठरलेल्या काळातचं होतील.

इतर बातम्या :

SSC Hall Ticket : दहावीच्या परीक्षेचं प्रवेशपत्र आजपासून ऑनलाईन मिळणार, बोर्डाच्या शाळांना महत्त्वाच्या सूचना

HSC SSC Exam : दहावी बारावीच्या परीक्षांची जोरदार तयारी, अमरावतीमध्ये केंद्रांची संख्या चौपट

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.