NEET SS 2021 नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनआणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला पोस्ट ग्रॅज्युएट नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट-सुपर स्पेशालिटी (NEET-SS) 2021 च्या परीक्षा पॅटर्नमध्ये शेवटच्या क्षणी बदल केल्यानं फटकारलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, ‘सत्तेच्या खेळात या तरुण डॉक्टरांना फुटबॉल समजू नका. आम्ही या डॉक्टरांना असंवेदनशील नोकरशहांच्या दयेवर सोडू शकत नाही. सरकारने त्यांची समस्या स्वत: सोडवावी. जर तुमच्या हातात अधिकार असेल तर तुम्ही त्याचा कोणत्याही प्रकारे वापर करु शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. डॉक्टरांच्या कारकिर्दीसाठी नीट एस एस परीक्षा खूप महत्वाची आहे. आता तुम्ही शेवटच्या क्षणी त्यामध्ये बदल करु शकत नाही, असं सुप्रीम कोर्टानं सुनावलं आहे.
Supreme Court pulls up the Centre, National Board of Examinations & National Medical Commission for making the last-minute change in the exam pattern of Post Graduate National Eligibility cum Entrance Test-Super Specialty (NEET-SS) 2021 pic.twitter.com/NtjrLxzcsp
— ANI (@ANI) September 27, 2021
न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना म्हणाले, “शेवटच्या क्षणी झालेल्या बदलांमुळे या तरुण डॉक्टरांची दिशाभूल होऊ शकते.” न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड म्हणाले, ‘तरुण डॉक्टरांसोबत संवेदनशीलतेनं वागलं पाहिजे. NMC (राष्ट्रीय वैद्यकीय आयोग) काय करत आहे? आपण डॉक्टरांच्या जीवनाशी खेळत आहोत. तुम्ही नोटीस बजावता आणि नंतर पॅटर्न बदलता? विद्यार्थी सुपर स्पेशॅलिटी अभ्यासक्रमांची तयारी कित्येक महिन्यांपूर्वीच सुरू करतात. परीक्षेपूर्वी काही कालावधीत त्यामध्ये बदलण्याची गरज आहे का? तुम्ही पुढच्या वर्षापासून बदल का करू शकत नाही?, अशा प्रश्नांची सरबत्ती कोर्टाच्या वतीनं करण्यात आली.
वकील जावेदूर रहमान यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, “NEET SS 2021 च्या तारखा 23 जुलै 2021 रोजी जाहीर करण्यात आल्या होत्या. परंतु बदललेल्या पॅटर्नला एक महिन्याहून अधिक काळानंतर 31 ऑगस्ट रोजी सार्वजनिक करण्यात आले, जेव्हा नीट एसएस परीक्षेला फक्त 2 महिने बाकी होते. 2018 आणि 2019 मध्ये जेव्हा परीक्षेच्या पद्धतीत बदल झाला होता, तेव्हा विद्यार्थ्यांना नीट एसएस परीक्षेच्या सुमारे 6 महिने आधी माहिती देण्यात आली होती. परंतु 23 जुलै 2021 च्या नोटिसीमध्ये त्याचा संदर्भ नव्हता.
परीक्षा कधी होणार
NBEMS द्वारे जारी करण्यात आलेल्या अधिकृत नोटिसनुसार नीट एस एस परीक्षा 13 आणि 14 नोव्हेंबर 2021 रोजी घेण्यात येईल. NEET SS प्रवेशपत्र 5 नोव्हेंबर रोजी जारी केले जाईल. अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार natboard.edu.in या संकेतस्थळावरून परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. परीक्षेचा निकाल आणि कट ऑफ 30 नोव्हेंबर 2021 रोजी जाहीर होईल.
इतर बातम्या:
NEET UG 2021: नीट यूजी परीक्षेला आजपासून सुरुवात, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
Supreme Court slam Central Government National Board of Examinations & National Medical Commission for Change Exam pattern of NEET SS