Teachers Day 2021: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीला शिक्षक दिन साजरा का करतात? वाचा सविस्तर
भारतात दरवर्षी 5 सप्टेंबरला देशभरातील शिक्षक आणि प्राध्यापकांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांचा गौरव करण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो. माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो.
नवी दिल्ली: भारतात दरवर्षी 5 सप्टेंबरला देशभरातील शिक्षक आणि प्राध्यापकांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांचा गौरव करण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो. माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षक म्हणून केलेल्या कामाचा गौरव म्हणून हा दिवस साजरा केला जातो.5 सप्टेंबर 1888 रोजी सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला होता.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी युवकांना शिक्षणाचं महत्व आणि त्याआधारे जीवनात बदल करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं. 1962 पासून 5 सप्टेंबर हा शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. शिक्षक दिन साजरा करण्यामागे राधाकृष्णन यांचा शिक्षण आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या दृष्टिकोनाचा सन्मान म्हणून साजरा केला जातो.
शिक्षक दिन हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्वाचा क्षण असतो. विद्यार्थी या दिवशी त्यांच्या जीवनातील शिक्षकांच्या प्रती आदर व्यक्त करतात. भारतात 5 सप्टेंबरला प्रत्येक शाळेत आणि महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा केला जातो. विद्यार्थी शिक्षक दिनानिमित्त वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन करतात.
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी पाच गोष्टी
- डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 ला तेलुगु कुंटंबात तिरुत्तानी मध्ये झाला. विद्यार्थी असताना त्यांना अनेक शिष्यवृत्ती मिळाल्या होत्या. तिरुपतीमध्ये शिक्षण घेतल्यानंतर ते वेलोर येथे शिक्षणासाठी गेले.
- ख्रिश्चन महाविद्यालय,मद्रास येथून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी तत्वज्ञानाचं शिक्षण घेतलं. राधाकृष्णन यांना भारतातील एक तत्ववेत्ता म्हणून ओळखलं जाते.
- तत्वज्ञानाचं शिक्षण घेतल्यानंतर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन मद्रास प्रेसिडेन्सी महाविद्यालयात तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.यानंतर ते म्हैसूर विद्यापीठात देखील तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
- डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून 1962 मध्ये निवड झाली होती. `1967 पर्यंत त्यांनी राष्ट्रपती म्हणून काम केलं आहे.
- सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी फिलॉसॉफी ऑफ रबींद्रनाथ टागोर, रिजन आणि रिलिजन इन कंटेम्पररी फिलॉसॉफी, द हिंदू विव्यू ऑफ लाईफ, आयडीलीस्ट विव्यू ऑफ लाईफ, कल्की ऑर द फ्युचर ऑफ सीव्हिलायझेशन, द रिलिजन वी नीड, गौतम द बुद्ध, इंडिया अँड चायना अशा पुस्तकांचं लेखन त्यांनी केलं.
थँक्यू टीचर महाराष्ट्र सरकारचा उपक्रम
महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षक दिनानिमित्त थँक्यू टीचर अभियान राबवलं आहे. थँक्यू टीचर अभियानांतर्गत 5 सप्टेंबरला सोशल मीडियावर पोस्ट करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. सोशल मीडियावर शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, असं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं आहे. शिक्षक दिनानिमित्त वर्षा गायकवाड यांनी केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
इतर बातम्या:
आमदारांचा पराक्रम, भर रेल्वेत चड्डी बनियनवर फिरले, आक्षेप घेताच प्रवाशांसोबतच भिडले
Teachers Day 2021 former President of India Sarvepalli Radhakrishnan birth anniversary celebrated as Teachers day know five things about him