TET Exam Scam : देशमुख, सावरीकरच्या सांगण्यावरुन आश्विनकुमारला 5 कोटी, पैशाचं वाटप पुणे पोलिसांच्या तपासात उघड

महराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षेतील घोटाळ्याप्रकरणी (TET exam Scam) रोज नवनवीन खुलासे होत आहेत. पुणे सायबर पोलिसांना (Pune Cyber Police) आरोग्य भरती परीक्षेचा तपास करताना टीईटी परीक्षेतील घोटाळ्याची लिंक लागली होती.

TET Exam Scam : देशमुख, सावरीकरच्या सांगण्यावरुन आश्विनकुमारला 5 कोटी, पैशाचं वाटप पुणे पोलिसांच्या तपासात उघड
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Feb 17, 2022 | 7:19 AM

पुणे : महराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षेतील घोटाळ्याप्रकरणी (TET exam Scam) रोज नवनवीन खुलासे होत आहेत. पुणे सायबर पोलिसांना (Pune Cyber Police) आरोग्य भरती परीक्षेचा तपास करताना टीईटी परीक्षेतील घोटाळ्याची लिंक लागली होती. त्यानंतर टीईटी परीक्षेत घोटाळा करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यांना, एजंट आणि परीक्षेची जबाबदारी असणाऱ्या जीएस. सॉफ्टवेअरच्या बड्या लोकांना अटक करण्यात आलीय. डॉ.प्रीतिश देशमुख आणि अभिषेक सावरीकर यांच्या सांगण्यावरून अश्विनकुमार शिवकुमार याला 5 कोटी 37 लाख रुपये देण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे. तर, या पाच कोटी रुपयांपैकी 2 कोटी रुपये जीएस सॉफ्टवेअरचा संस्थापक गणेशन याला देण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेत अधिकारीपदावर कार्यरत असलेल्या तुकाराम सुपे (Tukaram Supe) आणि सुखदेव डेरे यांना देखील पैसे देण्यात आल्याचं समोर आलंय.

पैसे कुणी गोळा केले

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेले एजंट संतोष हरकळ व अंकुश हरकळ यांनी नाशिक, जळगाव, जालना, बुलढाणा जिल्ह्यातील पाच एजंटाकडून हे पैसे जमा केले होते.त्यानंतर डॉ. देशमुख आणि सावरीकर यांच्या सांगण्यावरून ते अश्विनीकुमार याला देण्यात आले.

सुखदेव डेरे, तुकाराम सुपेला किती पैसे मिळाले?

अश्विनकुमार याने टीईटी 2018 मधील 600 ते 700 परीक्षार्थींचे गुण वाढविण्यासाठी त्यास मिळालेल्या पाच कोटी रुपयांपैकी दोन कोटी जी.ए.सॉफ्टवेअर कंपनीचा संस्थापक गणेशन याला दिले. राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष सुखदेव डेरे याला 20 लाख रुपये तर शिक्षण परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे यास 30 लाख रुपये दिले होते.

टीईटी परीक्षेमध्ये परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र करणारा जी ए सॉफ्टवेअरचा संचालक अश्विनीकुमार याने संस्थापक गणेशन याला तब्बल 2 कोटी रुपये दिले होते. शालेय शिक्षण विभागाचा उपसचिव सुशील खोडवेकर याची गणेशन याने तीन वेळा भेट घेतली असल्याचं समोर आलं आहे. खोडवेकर याच्या कडे परीक्षांसंबंधी काहीही अधिकार नसताना तो खोडवेकर याला कशासाठी भेटला याचा शोध सायबर पोलीसकडून सूरु आहे.जी ए सॉफ्टवेअरला काळ्या यादीतून काढण्यासाठीच सुपे याच्यावर दबाव आणण्यासाठीच ही भेट घेतली असल्याची शक्यता असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

इतर बातम्या:

दादा आपले मनस्वी आभार, भाजप नगरसेवकानं अजित पवारांच्या आभाराचे बॅनर्स लावले

VIDEO | मनसेला रामराम, कुख्यात गुंड गजानन मारणेच्या बायकोचा राष्ट्रवादीत प्रवेश

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.