TET Exam Scam : टीईटी परीक्षा गैरप्रकारातील मुख्य आरोपींना कोट्यवधी मिळवून दिले, पुणे पोलिसांकडून दोघांना अटक

शिक्षक पात्रता परीक्षा (TET) मधील गैरव्यवहाराची व्याप्ती वाढत चाललीय. पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) नाशिक आणि जळगावमधून दोघांना अटक केली आहे.

TET Exam Scam : टीईटी परीक्षा गैरप्रकारातील मुख्य आरोपींना कोट्यवधी मिळवून दिले, पुणे पोलिसांकडून दोघांना अटक
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jan 07, 2022 | 8:02 AM

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET) मधील गैरव्यवहाराची व्याप्ती वाढत चाललीय. पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) नाशिक आणि जळगावमधून दोघांना अटक केली आहे. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी दोघांना नाशिक आणि जळगाव मधून अटक केली आहे. नाशिक येथून आरोग्य विभागातील एक टेक्निशियन आणि चाळीसगाव येथून जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. या दोघांनी मिळून 350 परीक्षार्थींकडून तीन कोटी 85 लाख रुपये घेऊन ते एजंटमार्फत मुख्य आरोपींना दिल्याची बाब तपासात समोर आलीय.

दोघांना 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

पुणे सायबर पोलिसांनी टीईटी परीक्षा गैरप्रकार प्रकरणी सुरंजित गुलाब पाटील (वय 50, रा. नाशिक) आणि स्वप्नील तीरसिंग पाटील (रा. जळगाव) यांना अटक केली आहे. पुणे पोलिसांनी दोघांना अटक करुन न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांना 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर यापूर्वी अटकेत असलेले सुनील खंडू घोलप (वय 48, रा. भोसरी) आणि मनोज शिवाजी डोंगरे (वय 45 रा. लातूर) यांना 11 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. टीईटी परीक्षा प्रकरणी 13 आरोपींना अटक करण्यात आली असून चार कोटी 68 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तुकाराम सुपेच्या चालकला अटक

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात तुकाराम सुपे यांच्या कार्यालयीन गाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या सुनील घोलपसह मनोज शिवाजी डोंगरे यास सायबर पोलिसांनी अटक केली आहे. घोलप याने २०२० मधील शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अन्य आरोपींशी संगनमत करून अपात्र विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये घेतले असल्याची बाब समोर आलीय. सुपे हा त्याच्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांची नावे, त्यांचे हॉल तिकीट घोलप याच्या व्हॉट्स अपवर पाठवित होता. त्यानंतर घोलप ते अन्य साथीदाराला पाठवित असल्याचे तपासात समोर आलयं. सुपेचा चालक सुनील घोलप आणि अभिषेक सावरीकर यांच्यातील मोबाईल चॉटिंग पोलिसांच्या हाती आलं आहे. यामध्ये परिक्षेतील गैरव्यावहाराबाबत बोलणी झाली असल्याचं पोलिसांची माहिती आहे. सुनील घोलपचा पैशांच्या देवाण-घेवाणीत सहभाग दिसून आला असल्याचं तपासात समोर आले आहे.

म्हाडा आणि टीईटी परीक्षा घोटाळा, जी ए सॉफ्टवेअरच्या संस्थापकाला नोटीस

म्हाडा आणि टीईटी परीक्षेच्या घोटाळ्यात जी ए सॉफ्टवेअरच्या संस्थापकाचाही समावेश असल्याची बाब पुणे पोलिसांच्या तपासात समोर आल्याचं उघड झालं आहे. पुणे सायबर पोलिसांनी जी ए सॉफ्टवेअरचा संस्थापक गणेशन याला चौकशीला हजर राहण्यासाठी नोटीस बजावली होती. मात्र, नोटीस देऊनही संस्थापक चौकशीला गैरहजर राहिला होता. आतापर्यंत जी ए सॉफ्टवेअरच्या प्रितीश देशमुख आणि अश्विनकुमार यांना अटक करण्यात आली आहे.

इतर बातम्या:

Agricultural Prices : शेतकऱ्यांनाच समजले बाजारपेठेतले अर्थकारण, अन् झाला ‘हा’ बदल

Udayanraje Bhonsle : उदयनराजे भोसले ‘पुष्पा : द राईज’वर फिदा, मित्रांसह घेतला सिनेमाचा आनंद

TET Exam Scam Pune Cyber Police arrested two persons from Nashik and Jalgaon

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.