TET Scam: टीईटी घोटाळा! 17 शिक्षकांच्या प्रमाणपत्रावर शंका, वेतन थांबवलं

त्यामुळे त्या 17 शिक्षकांचे शालार्थ आयडी गोठवून वेतन रोखण्यात आले आहे. संबधीत 17 शिक्षक हे विविध शाळांमधील आहेत. त्यामुळे टीईटी घोटाळ्याची व्याप्ती जिल्ह्यात आणखी वाढण्याची शक्यता असल्याने अनेक शिक्षकांमध्ये धाकधूक वाढली आहे.

TET Scam: टीईटी घोटाळा! 17 शिक्षकांच्या प्रमाणपत्रावर शंका, वेतन थांबवलं
TET Exam Scam
Follow us
| Updated on: Aug 23, 2022 | 10:49 AM

राज्यात टीईटी पात्रता घोटाळा (TET Scam) निघाल्याने अनेक शिक्षकांवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्या जात आहेत त्यामुळे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षेत जिल्ह्यातून असल्याने त्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन गोठविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शिक्षक पात्रता प्रमाणपत्र अर्थात टीईटी घोटाळ्याची चर्चा संपूर्ण राज्यात सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षण  विभागामार्फत (Education Department) पडताळणी केली जात आहे. या पडताळणीसाठी जिल्ह्यातून 17 शिक्षकांच्या प्रमाणपत्रावर (TET Certificate) शंका आल्याने या प्रमाणपत्रांचा पडताळणीसाठी पाठविण्यात आल्याने त्यांची चौकशी केली जाणार असून त्याचा अहवाल लवकरच प्राप्त होईल. त्यामुळे त्या 17 शिक्षकांचे शालार्थ आयडी गोठवून वेतन रोखण्यात आले आहे. संबधीत 17 शिक्षक हे विविध शाळांमधील आहेत. त्यामुळे टीईटी घोटाळ्याची व्याप्ती जिल्ह्यात आणखी वाढण्याची शक्यता असल्याने अनेक शिक्षकांमध्ये धाकधूक वाढली आहे.

मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा

अंमलबजावणी संचालनालयाने टीईटी घोटाळा प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. ईडीने टीईटी परीक्षा, आरोग्य विभाग परीक्षा एएमडी म्हाडा परीक्षेशी संबंधित पुणे पोलिसांकडे दाखल झालेल्या घोटाळ्यांची माहिती मागवली. शिक्षक पात्रता परीक्षा (TET Scam) या घोटाळ्यात असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी जारी करण्यात आली आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली. हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख यांची नावे या यादीत असल्याचे समोर आले. आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची ही नावं आहेत. याबाबत अब्दुल सत्तार यांना विचारले असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. आता या संदर्भातली नवीन माहिती समोर येत आहे. या संदर्भातील चौकशी अंमलबजावणी संचालनालय, ईडी करणार असल्याचं समोर आलंय.

हे सुद्धा वाचा

…तर आमच्यावर बिनधास्त कारवाई करा

अब्दुल सत्तार यांना विचारले असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ही यादी 2019 मध्ये जी टीईटीची परीक्षा झाली आहे, त्या विद्यार्थ्यांची आहे. माझ्या मुलींनी 2020 मध्ये टीईटीची (TET) परीक्षा दिली होती आणि त्या या परीक्षेत अपात्र ठरल्या होत्या मग या यादीत त्यांचे नाव कसे आले असा सवाल अब्दुल सत्तार यांनी उपस्थित केला आहे. तसेच यासंबंधात जर माझ्या संस्थेकडून शिक्षण विभागाला किंवा कोणाला एखादे साधे पत्र जरी गेले असेल तर आमच्यावर बिनधास्त कारवाई करा असेही अब्दुल सत्तार यांनी म्हटले.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.