दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तयारी पूर्ण, विद्यार्थ्यांनो सज्ज राहा, यंदा तब्बल इतके विद्यार्थी

10th and 12th exams : दहावी आणि बारावीच्या परीक्षांना आता लवकरच सुरूवात होत आहे. मंडळाकडून जवळपास सर्व तयारी ही पूर्ण झालीये. या परीक्षांसाठी आता जवळपास 1 लाख 80 हजार कर्मचारी तैनात असणार आहेत. यंदा याच महिन्यात बारावीच्या परीक्षांना सुरूवात ही होणार आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तयारी पूर्ण, विद्यार्थ्यांनो सज्ज राहा, यंदा तब्बल इतके विद्यार्थी
Follow us
| Updated on: Feb 18, 2024 | 12:06 PM

मुंबई : दहावी आणि बारावीच्या परीक्षांना आता लवकरच सुरूवात होणार आहे. सर्वत्र परीक्षेचे वातावरण बघायला मिळतंय. दहावी बारावीच्या परीक्षांसाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ देखील सज्ज झाल्याचे बघायला मिळतंय. या परीक्षांची जय्यत तयारी देखील सुरू आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठीची जवळपास तयारी पूर्ण झाल्याचे देखील बघायला मिळतंय. राज्य भरात या परीक्षांसाठी कर्मचारी देखील तैनात केले जाणार आहेत.

दहावी बारावीच्या परीक्षांसाठी 1 लाख 80 हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सर्व परीक्षा या सुरळीत पार पडण्यासाठी मंडळाकडून प्रयत्न ही केली जात आहेत. यंदा बारावीचे 15 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दहावीचे 16 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. हा आकडा खरोखरच खूप जास्त मोठा आहे. यामुळेच मंडळाने जोरदार तयारी केलीये.

दहावी आणि बारावीचे एकून मिळून 31 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षांची आवश्यक सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती बोर्ड प्रशासनाकडून देण्यात आलीये. आता या परीक्षांना अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. बारावीची परीक्षा तर याच महिन्यापासून सुरू होतंय. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होतंय.

दुसरीकडे दहावीची परीक्षा ही 1 मार्च 2024 पासून होणार सुरू होत आहे. राज्यभरातील परीक्षा केंद्रावर देखील तयारी पूर्ण झालीये. बारावीच्या परीक्षा तब्बल 3 हजार 320 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येत आहेत. दहावीची परीक्षा 5 हजार 86 केंद्रावर घेण्यात येणार आहे. दहावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आकडा मोठा आहे.

यंदाची परीक्षा ही काॅपी मुक्त करण्यासाठी देखील प्रशासनाकडून पाऊले ही उचलली जात आहेत. मागील काही वर्षांपासून राज्यात काॅपी मुक्त परीक्षा घेण्यावर प्रशासनाचा भर दिसतोय. काॅपी मुक्त परीक्षा घेण्यासाठी तगडा बंदोबस्त प्रशासनाकडून परीक्षा केंद्रावर ठेवण्यात आलाय. दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तयारी ही जवळपास आता पूर्ण झालीये.

Non Stop LIVE Update
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?.