Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CBSE 10th 12th Exam 2023: तुमचा पॅटर्नच वेगळाय ! डायलॉग नाही, तुमचा पॅटर्न वेगळाय आता, पर्यायी प्रश्न घटले…

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अत्यंत सोप्या प्रश्नपत्रिका देण्यात येत होत्या. मात्र, आता परिस्थिती पूर्ववत झाल्याने बोर्डाने पुन्हा जुन्याच पॅटर्नवर परतण्याचा निर्णय घेतला आहे.

CBSE 10th 12th Exam 2023: तुमचा पॅटर्नच वेगळाय ! डायलॉग नाही, तुमचा पॅटर्न वेगळाय आता, पर्यायी प्रश्न घटले...
अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशात मोठा बदल
Follow us
| Updated on: May 23, 2022 | 2:24 PM

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 2022-23 या सत्रासाठी बोर्डाच्या परीक्षांचा पॅटर्न (New Pattern) जाहीर केला आहे. जारी करण्यात आलेल्या पॅटर्ननुसार पर्यायी प्रश्न 50 टक्क्यांवरून 20 टक्के करण्यात आले आहेत. त्यामुळे आता तरी परीक्षेत असेच विद्यार्थी पास होऊ शकणार आहेत जे रट्टा मारण्यापेक्षा समजून घेऊन अभ्यास करण्याला प्राधान्य देतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अत्यंत सोप्या प्रश्नपत्रिका (Question Papers) देण्यात येत होत्या. मात्र, आता परिस्थिती पूर्ववत झाल्याने बोर्डाने पुन्हा जुन्याच पॅटर्नवर परतण्याचा निर्णय घेतला आहे.

बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी परीक्षेत केस स्टडी आणि ॲबिलिटी चेक बेस्ड प्रश्नांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. केस स्टडीवर आधारित प्रश्न विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे अचूक मूल्यमापन करतात. त्यासाठी बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना चांगल्या तयारीनिशी जावे लागते. सत्र 2021-22 मध्ये बोर्ड परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्यात आली ती पुढील सत्र 2022-23 पासून रद्द करण्यात आली आहे.

सत्र 2022-23 च्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकेचा मसुदाही बोर्डाने जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी वेळेत करता यावी, यासाठी या स्वरूपातील परीक्षांची तयारी करून घेण्याच्या सूचना सर्व प्राचार्यांना देण्यात आल्या आहेत. केस स्टडीचे प्रश्न विद्यार्थ्यांना शिकवलेलं किती कळलं याचं आकलन व्हायला मदत करतात. कारण केस स्टडीच्या आधारावर विचारले जाणारे प्रश्न विद्यार्थी रट्टा मारून सोडवू शकत नाहीत.

हे सुद्धा वाचा

2022-23 या सत्रापासून नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण आकलन आणि गुणवत्तेवर आधारित असणारे. त्याआधारे मूल्यमापन करण्यात येणार आहे. पुढील सत्राच्या परीक्षांमध्ये गुणवत्तेवर आधारित प्रश्नांची संख्या 10 टक्क्यांनी वाढवण्यात येणार आहे. सत्र 2021-22 मध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेत 50 टक्के वैकल्पिक प्रश्न विचारण्यात आले होते, जे सत्र 2022-23 साठी 20 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. पुढील सत्रापासून नववी आणि अकरावीच्या वार्षिक परीक्षाही या प्रश्नपत्रिकेच्या पॅटर्नवर आधारित असतील. मात्र, अंतर्गत मूल्यांकनात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप 1 असे आहे

  • मेरिट बेस्ड प्रश्न – 30 टक्के
  • वैकल्पिक प्रश्न – 20 प्रतिशत
  • लघु आणि दीर्घोत्तरी प्रश्न – 50 टक्के

इयत्ता 9 वी व 11 वीच्या प्रश्नपत्रिकेचा प्रकार

  • गुणवत्तेवर आधारित प्रश्न – 40 टक्के
  • वैकल्पिक प्रश्न – 20 प्रतिशत
  • लघु आणि दीर्घोत्तरी प्रश्न – 40 टक्के
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.