Teacher Photo: आता शिक्षकांचे फोटो वर्गात झळकणार, ‘आपले गुरुजी‘ अभियानाचा दणका!
आता 2 आठवड्यात याबाबत पुर्तता करण्याचे आदेश देण्यात आलेत. त्याचबरोबर सर्व शाळांनी यासंदर्भातली कार्यवाही करावी आणि कार्यवाही नंतर तो अहवाल कार्यालयात सादर करावा अशा सूचनाही देण्यात आल्यात.
‘आपले गुरुजी’ (Aaple Guruji) या नावाने वर्गात संबंधित शिक्षकांचा फोटो लावा याबाबत मंत्रीमंडळात चर्चा झाल्याने २ आठवड्यात याबाबत पुर्तता करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) हा अजब गजब निर्णय घेतल्याने या निर्णयामुळे मोठा संभ्रम निर्माण झालाय. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक वर्गात स्वतः उपस्थित न राहता इतर कोणालाही पाठवायचे अशी प्रकरण वाढत असल्याने शासनाने वर्गात शिक्षकांचे फोटो (Teacher Photo) लावण्याचा अजब निर्णय घेतलाय. आता 2 आठवड्यात याबाबत पुर्तता करण्याचे आदेश देण्यात आलेत. त्याचबरोबर सर्व शाळांनी यासंदर्भातली कार्यवाही करावी आणि कार्यवाही नंतर तो अहवाल कार्यालयात सादर करावा अशा सूचनाही देण्यात आल्यात.
शिस्त लावण्यासाठी सरकारने कंबर कसली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील दांडीबहाद्दर शिक्षकांना शिस्त लावण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. शाळेत न जाताच सरकारचा पगार घेऊन कामावर दांडी मारणाऱ्या शिक्षकांना शिस्त लावण्यासाठी सरकारने आता कंबर कसलीये. यापुढे प्रत्येक वर्गात त्या वर्गावर शिकविणाऱ्या शिक्षकाचे फोटो लावण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहेत. सरकारी शाळामंधील अनेक शिक्षक पगार सरकारचा आणि काम मात्र दुसऱ्याचे असे करीत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. ग्रामीण भागात तर जिल्हा परिषद शाळांमधील बहुतांश शिक्षक शाळेकडे फिरकतच नसल्याचे आढळले आहे. काही ठिकाणी तर नाममात्र वेतनावर परस्पर आपल्या जागी एखाद्या व्यक्तीची शिक्षक म्हणून नियुक्ती करीत सरकारकडून मात्र चांगला पगार घेणाऱ्या शिक्षकांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे या शिक्षकांना शिस्त लागण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
या हेतूने ‘आपले गुरूजी’ अभियान राबविण्यात येणार
त्याचबरोबर शिक्षकांप्रती विद्यार्थ्यांमध्ये आदराची भावना निर्माण व्हावी या हेतूने ‘आपले गुरूजी’ अभियान राबविण्यात येणार आहे. यामुळे आपल्यासाठी सरकारने कोणते शिक्षक नियुक्त केलेत, याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी आणि त्यातून बोगस शिक्षक कोण हे माहीत व्हावे यासाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे. यामुळे दांडी बहाद्दर शिक्षकांनासुद्धा चाप लागणार आहे.