या तरूणाला अमेरिकेच्या फर्मकडून मिळाले रेकॉर्डब्रेक पॅकेज, आकडा ऐकून डोळे विस्फारतील
याआधी एनआयटी पाटणाच्या आदिती तिवारी हीला फेसबुक कंपनीकडून सर्वाधिक 1.6 कोटी रुपयांचे पगाराचे पॅकेज मिळाले होते.

दिल्ली : एका भारतीय विद्यार्थ्याला अमेरिकेच्या सर्वात मोठ्या ई – कॉमर्स कंपनीने तगडे पॅकेज दिले आहे. आतापर्यंतचे एखाद्या एनआयटीच्या विद्यार्थ्याला मिळालेले हे सर्वात मोठे पॅकेज आहे. या विद्यार्थ्याला मिळालेले हे सॅलरी पॅकेज आतापर्यंत आयआयटीज् किंवा आयआयएमच्या विद्यार्थ्यांनाही मिळालेले नाही. तर पाहूया कोण आहे तो मेहनती तरुण ज्याला जगातील सर्वात मोठी ई – कॉमर्स कंपनीने रेकॉर्डब्रेक पगाराचे पॅकेज दिले आहे.
या तरुणाचे नाव अभिषेक कुमार असून तो एनआयटी पाटणाचा विद्यार्थी आहे. अभिषेक पाटणापासून 194 किमीवर असलेल्या झाझाचा रहीवासी असून तो कंप्युटर सायन्सचा विद्यार्थी आहे. अभिषेक याला त्याची निवड झाल्याचे कन्फर्मेशन 21 एप्रिल 2022 मध्ये मिळाले. त्याने डिसेंबर 2021 मध्ये कोडींग टेस्ट पास केली होती. त्यानंतर एक- एक तासांच्या मुलाखतीचे तीन राऊंड होऊन 13 एप्रिल 2022 रोजी त्याची निवड अखेर अॅमेझॉन या बड्या कंपनीत झालीय. अभिषेक याची मुलाखत घेण्यासाठी जर्मनी आणि आर्यलॅंड येथील तज्ज्ञ आले होते. त्याने आत्मविश्वासाने मुलाखतकर्त्यांना इम्प्रेस केले आणि या तिनही फेऱ्या जिंकल्याने त्याची निवड करण्यात आली आहे. त्याला 1.8 कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे. इतकी तगडी पगाराची ऑफर आयआयटी किंवा आयआयएमच्या विद्यार्थ्यांनाही मिळालेली नाही.
नवीन आव्हाने घ्यायला आवडते
अभिषेक सॉफ्टवेअर इंजिनियर असून त्याला एक वर्षांचा अनुभव आहे. जावा, सी प्लस प्लस, स्प्रिंग बूट, जावा स्क्रीप्ट, लिनक्स आणि इतर डाटा बेसचा आपल्याला अनुभव आहे. त्याला नेटवर्कींग आणि डाटाबेस इंजिनिअरिंगचे डेप्थ नॉलेज आहे. आपल्याला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये सतत नवीन आव्हाने घ्यायला आवडते असे अभिषेक कुमार याने लिंक्डइन प्रोफाईलवर लिहीले आहे.