General Knowledge: पाकिस्तानचा पासपोर्ट जगात खूप मागे, जाणून घ्या टॉप-10 लिस्ट; भारत या क्रमांकावर
2023 मध्ये पुन्हा एकदा रँकिंग समोर आलीये, त्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रमवारीत फरक आहे.
पासपोर्टचं महत्त्व जगभरात खूप जास्त आहे, कारण पासपोर्टच्या माध्यमातूनच तुम्ही दुसऱ्या देशात प्रवेश करू शकता आणि तुम्हाला तुमचं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पासपोर्टची गरज आहे. 2023 मध्ये पुन्हा एकदा रँकिंग समोर आलीये, त्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रमवारीत फरक आहे. पाकिस्तान सीरिया, इराक आणि अफगाणिस्तानसारख्या कमकुवत देशांच्या पासपोर्ट एकमेकांच्या रँकिंगच्या जवळ आहेत. त्याचबरोबर भारताचे रँकिंग कौतुकास्पद आहे. जपानने पहिल्या क्रमांकावर कब्जा केला आहे. लंडनस्थित ट्रॅव्हल हेन्ले अँड पार्टनर्सने 2023 साठी पासपोर्ट रँकिंग जाहीर केले आहे. या यादीतील 109 देशांपैकी पाच सर्वात वाईट पासपोर्टमध्ये पाकिस्तानी पासपोर्टचा समावेश आहे.
या यादीत विचारात घेण्यात आलेल्या 227 ट्रॅव्हल डेस्टिनेशन्सपैकी केवळ 35 ठिकाणीच पाकिस्तानी पासपोर्टधारकांना व्हिसा फ्री किंवा व्हिसा ऑन अरायव्हल एन्ट्रीची परवानगी आहे.
त्यानंतर सीरिया (25 डेस्टिनेशन), इराक (29 डेस्टिनेशन), आणि अफगाणिस्तान (27 डेस्टिनेशन) यांचा क्रमांक लागतो.
त्याचबरोबर लंडनस्थित कंपनीने जाहीर केलेल्या तिमाही अहवालानुसार भारत पाकिस्तानपेक्षा कितीतरी पटीने सरस असून 85व्या क्रमांकावर आहे. भारताने 59 ठिकाणी व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी दिली आहे.
जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट जपानचा आहे. जपानकडून 193 डेस्टिनेशनवर व्हिसा-मुक्त प्रवेश दिला जातो, जपान सलग पाचव्या वर्षी अग्रस्थानी आहे.
सिंगापूर आणि दक्षिण कोरियाने क्रमवारीत संयुक्त दुसऱ्या स्थानावर आपले स्थान कायम राखले, त्यानंतर जर्मनी आणि स्पेन आणि त्यानंतर इतर युरोपियन देशांचा क्रमांक लागतो.
अमेरिका 22 व्या क्रमांकावर असून त्याखालोखाल स्वित्झर्लंड, न्यूझीलंड आणि नॉर्वेचा क्रमांक लागतो. चीन आणि बोलिव्हिया हे देश 59 च्या समान रँकिंगवर आहेत, कारण या देशांच्या पासपोर्टवर 80 डेस्टिनेशन व्हिसा-फ्री एन्ट्री आहे.
रशिया 37 व्या क्रमांकावर आहे, जो 118 डेस्टिनेशनवर व्हिसा-मुक्त प्रवेश देतो. ब्लूमबर्गने एक लिस्ट शेअर केली आहे, जी सोशल मीडियावरही खूप व्हायरल होत आहे, जी आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत.
2023 मध्ये असलेले सर्वोत्तम पासपोर्ट
- जपान (193 डेस्टिनेशन)
- सिंगापूर, दक्षिण कोरिया (192 डेस्टिनेशन)
- जर्मनी, स्पेन (190 डेस्टिनेशन)
- फिनलंड, इटली, लक्झेंबर्ग (189 डेस्टिनेशन)
- ऑस्ट्रिया, डेन्मार्क, नेदरलँड्स, स्वीडन (188 डेस्टिनेशन)
- फ्रान्स, आयर्लंड, पोर्तुगाल, युनायटेड किंग्डम (187 डेस्टिनेशन)
- बेल्जियम, न्यूझीलंड, नॉर्वे, स्वित्झर्लंड, अमेरिका, झेक प्रजासत्ताक (186 डेस्टिनेशन)
- ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ग्रीस, माल्टा (185 डेस्टिनेशन)
- हंगेरी, पोलंड (184 डेस्टिनेशन)
- लिथुआनिया, स्लोव्हाकिया (183 डेस्टिनेशन)