QS Ranking कडून जगातल्या टॉप MBA College ची यादी जाहीर! भारतातील Top 10 MBA College
या रँकिंग लिस्ट मध्ये भारतातले किती कॉलेज आहेत? कोणते कॉलेज आहे? दरवर्षी आपल्याकडे एमबीए करण्यासाठी उत्सुक असणारे विद्यार्थी अनेक असतात.
QS Ranking हे जगातील सर्वोत्कृष्ट रँकिंग आहे. या अंतर्गत विद्यापीठांना रँकिंग दिली जाते. क्यूएस रँकिंग कडून जगातील सर्वोत्कृष्ट बिझनेस स्कूलची यादी जाहीर करण्यात आलीये. मग या रँकिंग लिस्ट मध्ये भारतातले किती कॉलेज आहेत? कोणते कॉलेज आहे? दरवर्षी आपल्याकडे एमबीए करण्यासाठी उत्सुक असणारे विद्यार्थी अनेक असतात. त्यामुळे देशातले एमबीए साठीचे उत्तम कॉलेज कोणते हे माहित असणं गरजेचं आहे. दरम्यान यातील सर्वोत्तम 50 एमबीए कॉलेजांमध्ये भारताच्या दोन आयआयएमना स्थान मिळाले आहे, ही अभिमानाची बाब आहे. यासोबतच भारतात अशी 4 एमबीए कॉलेज आहेत, ज्यांनी वर्ल्ड टॉप 100 मध्ये स्थान मिळवलं आहे.
विद्यापीठाच्या क्रमवारीसाठी जगातील सर्वात प्रतिष्ठित क्यूएस रँकिंगने 2023 साठी जगातील सर्वोत्कृष्ट बिझनेस स्कूलची यादी जाहीर केलीये.
क्यूएस रँकिंग 2023 एमबीएची यादी क्यूएस topuniversities.com अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आली आहे. यात भारतातले किती आणि कोणते कॉलेज आहेत त्यांचं रँकिंग काय हे आपल्याला माहित असायलाच हवं.
भारतातील टॉप 10 MBA College
- IIM Ahmedabad/ ग्लोबल रँक 44 /QS स्कोअर 68.2
- IIM Bangalore / ग्लोबल रँक 50 /QS स्कोअर 65.9
- IIM Calcutta / ग्लोबल रँक 68 / QS स्कोअर 61
- इंडियन स्कूल ऑफ बिजनेस हैदराबाद, मोहाली/ ग्लोबल रँक 78 / QS स्कोअर 58.9
- IIM Indore / ग्लोबल रँक 151-200 / QS स्कोअर 46.8
- एसपी जैन IMR, मुंबई / ग्लोबल रँक 151-200 / QS स्कोअर 46.5
- XLRI जेवियर स्कूल ऑफ मॅनेजमेंट जमशेदपुर/ ग्लोबल रँक 151-200 / QS स्कोअर 45.3
- IIM Lucknow लखनऊ/ ग्लोबल रँक 151-200 /QS स्कोअर 43.7
- मॅनेजमेंट डेवलपमेंट इंस्टीट्यूट, गुरुग्राम /ग्लोबल रँक 201-250/ QS स्कोअर 38.3