Toyota Technical Training Institute | गरिबांच्या मुलांना मोफत शिक्षण, गलेलठ्ठ पगाराची नोकरी, शब्दांमध्ये न सांगता येणारा उपक्रम

आम्ही स्वत: या शिक्षण संस्थेला भेट दिली. या शिक्षण संस्थेचे प्रमुख के. आर. व्यंकटेश यांच्याशी आम्ही संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या इन्स्टीट्यूटची व्याप्ती किती मोठी आहे या विषयी माहिती दिली. या शाळेत सध्या मुलींची संख्या कमी आहे. पण पुढच्या वर्षी मुलींसाठी विशेष एक बॅच सुरु केली जाणार असल्याची माहिती के. आर. व्यंकटेश यांनी दिली.

Toyota Technical Training Institute | गरिबांच्या मुलांना मोफत शिक्षण, गलेलठ्ठ पगाराची नोकरी, शब्दांमध्ये न सांगता येणारा उपक्रम
Follow us
| Updated on: Oct 22, 2023 | 12:13 AM

बंगळुरु | 21 ऑक्टोबर 2023 : लहानपणी मी एक स्वप्न वाटणाऱ्या आजोबांची गोष्ट ऐकली होती. हे आजोबा त्यांच्या पोतडीत स्वप्न घेऊन फिरायचे. आजोबा लहान मुलांना भेटायचे. त्यांच्याशी खूप गप्पा मारायचे. चर्चा करायचे. त्यानंतर ते मुलांना आपल्या पोतडीतून एक स्वप्न काढून द्यायचे. ही एक काल्पनिक कथा आहे. पण खऱ्या दुनियेतही अशा काही संस्था आहेत ज्या गरीब, होतकरु कुटुंबातील मुलांना स्वप्न दाखवतात, स्वप्न साकार करण्यासाठी मार्गदर्शन करतात आणि मुलांचं स्वप्न साकार करतात.

कवी विंदा करंदीकर यांची ‘देता’ कविता आपल्याला माहिती आहे. “देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे”, असं विंदा करंदीकर कवितेत म्हणाले आहेत. या कवितेचा भावार्थ खूप काही सांगणारा आहे. आपण आकाशात भरारी घ्यावी. यशाच्या सर्वोच्च शिखरावर झेप घेत राहावं. एखाद्या अमृतवेलासारखं आकाशाच्या दिशेने झेप घेत राहावी. पण पुढे जात असताना जमिनीकडे खाली वळून जरुर पाहावं. जमिनीवरुन जे आकाशाकडे झेप घेऊ पाहत आहेत त्यांना आकाशात झेप घेण्यासाठी एक हात पुढे करावा, त्यांना आपल्यासोबत आकाशाकडे भरारी घेण्यासाठी मदत करावी. त्यांच्या पंखांमध्ये बळ द्यावं.

आकाशात झेप घेणाऱ्या अशा संस्थांपैकी एक संस्था भारतात अविरतपणे काम करतेय. ही संस्था ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमधील सर्वात नामांकीत कंपन्यांपैकी एक आहे. पण सामाजिक भान म्हणून या संस्थेकडून राबवले जाणारे उपक्रम खरोखरंच वाखणण्याजोगे आहेत. भारताची लोकसंख्या ही जगात सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे या सर्वाधिक लोकसंख्येत तरुणांचं प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे भारत हा देशा प्रगतीपथावर म्हणजे विकसनशील देश आहे, असं मानलं जातं. पण या सर्वात तरुण देशातील तरुणांच्या हाती रोजगार असणं खूप महत्त्वाचं आहे.

भारत सरकारकडून स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. सरकार आपल्या परीने खूप वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करत आहे. सरकारचे प्रयत्न सुरुच आहेत. पण एक संस्था सामाजिक जाणीवेतून खूप मोठं काम करतेय. ही संस्था मूळची जपानची. हो, जपान हा तोच देश ज्याला आपण उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखतो. आपल्या आयुष्यात आपल्यावर प्रकाश पाडणारी माणसं असली की आपलं आयुष्य उजळून निघतं. तसंच काहीसं या उगवत्या सूर्याच्या देशाच्या एका कंपनीकडून भारतात केलं जातंय.

जपानची टोयोटा नावाची एक नामांकीत ऑटोमोबाईल कंपनी आहे. या कंपनीचा भारतात कर्नाटक राज्यातील बंगळुरु शहरात मोठा प्लांट आहे. याच प्लांटमध्ये दररोज शेकडो टोयोटा वाहनांचं उत्पादन होतं. इथे प्रत्येक वाहनाला नखशिखांत जन्म दिला जातो. इथून संपूर्ण भारतात आणि जगात वाहनांचा पुरवठा केला जातो. कंपनीचं उत्पादन चांगलं आहे. या कंपनीची उलाढालही चांगली आहे. या कंपनीत केवळ बंगळुरुच्या प्लांटमध्ये जवळपास 10 हजार कर्मचारी प्रत्यक्ष ते अप्रत्यक्षपणे काम करतात. याच कंपनीकडून सध्या जो मोठा सामाजिक उपक्रम राबवला जातोय, त्या विषयी आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

टोयटा कंपनीचा कर्नाटकच्या बंगळुरु येथे मोठा प्लांट आहे. इथे कंपनीच्या अनेक गाड्यांना जन्म दिला जातो. याच ठिकाणी कंपनीने टोयोटा टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टीट्यूट उभारलं आहे. इथे चार प्रकारचे वेगवेगळे कोर्सेस आहेत. यातील दोन कोर्सेस हे दोन वर्षांचे तर दोन कोर्सेस हे तीन वर्षांचे आहेत. या कोर्सेमधून एक चारचाकी गाडी कशी बनते, तिचं इंजिन कसं असतं, अशी ए टू झेड माहिती शिकवली जाते. या इन्स्टीट्यूटमध्ये फक्त गरीब, होतकरु, खेडे गावातील, शेतकऱ्यांचा आणि घरची परिस्थिती बेताची असलेल्या हुशार मुलांनाच संधी दिली जाते. गाव-खेड्यातील गरिबांची मुलं मुख्य प्रवाहात यावेत, त्यांना रोजगाराची चांगली संधी मिळावी, असा यामागे कंपनीचा उद्देश आहे.

विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी

विशेष म्हणजे इथे विद्यार्थ्यांना फक्त टेक्निकल शिक्षण नाही तर त्यांच्या व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी देखील या इन्स्टीट्यूटमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. यामध्ये सकाळी परेड करणं, व्यायाम करणं, तसेच विविध खेळांमध्ये सहभाग घेणं या सर्व गोष्टींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या खेळाच्या कौशल्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी उपलब्ध करुन दिली जाती. त्यातून एका विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं प्रतिनिधीत्व करताना कांस्य पदक देखील पटकावलं आहे. या विद्यार्थ्याचं स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे.

दररोज सकाळी विद्यार्थ्यांचा परेडचा कार्यक्रम पार पडतो 

विद्यार्थ्यांचा शिक्षण, वास्तव्याचा सर्व खर्च कंपनीचा

आम्ही स्वत: या शिक्षण संस्थेला भेट दिली. या शिक्षण संस्थेचे प्रमुख के. आर. व्यंकटेश यांच्याशी आम्ही संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या इन्स्टीट्यूटची व्याप्ती किती आहे या विषयी माहिती दिली. या शाळेत सध्या मुलींची संख्या कमी आहे. पण पुढच्या वर्षी मुलींसाठी विशेष एक बॅच सुरु केली जाणार असल्याची माहिती के. आर. व्यंकटेश यांनी दिली. यावेळी एक महत्त्वाची गोष्ट व्यंकटेश यांनी नमूद केली. टोयोटा कंपनी इथे शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च उचलते. तसेच त्यांचा वास्तव्याचा आणि इतर सर्व खर्च टोयोटा कंपनी उचलते. विद्यार्थ्यांना वास्तव्यासाठी शाळेतच खोल्या आहेत. तिथे हे विद्यार्था राहतात.

विद्यार्थ्यांचा वास्तव्याचा खर्च कंपनीकडून केला जातो. विद्यार्थ्यांसाठी स्पेशल खोल्या आहेत. एका खोलीत प्रत्येकी चार विद्यार्थ्यांची सोय केली जाते.

50 टक्के विद्यार्थ्यांना आपल्याच कंपनीत नोकरीची संधी

विशेष म्हणजे टोयोटा कंपनी या इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेणाऱ्या जवळपास 50 टक्के विद्यार्थ्यांना आपल्याच कंपनीत नोकरीची संधी देते. या विद्यार्थ्यांचा सुरुवातीचा पगारच महिन्याला 30 ते 50 हजार रुपये मिळतो. तर अनेक विद्यार्थ्यांना विदेशात नोकरीची संधी उपलब्ध होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना स्वत:च्या आणि कुटुंबाच्या विकासासाठी मोठी मदत होते. टोयोटा कंपनीच्या या उपक्रमामुळे गरीब, होतकरु, गरजू कुटुंबातील हुशार मुलांचा रोजगाराचा प्रश्न मिटतोय. कंपनीच्या या उपक्रमाला संपूर्ण राज्यातून चांगला प्रतिसाद मिळतो.

विद्यार्थ्यांना प्रात्याक्षिकपणे सर्व गोष्टी शिकवल्या जातात.

कंपनी इतर राज्यातही उपक्रम राबवणार

आम्ही टोयोटा कंपनीच्या या उपक्रमाबद्दल आणखी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. टोयोटा कंपनी महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील मुलांच्या शिक्षण आणि रोजगारासाठी देखील असा उपक्रम राबवेल का? किंवा हा उपक्रम संपूर्ण देशासाठी खुला आहे का? याबाबतची माहिती मिळवण्याचा आम्ही प्रयत्न केला. यावेळी कंपनीकडून अतिशय महत्त्वाची माहिती देण्यात आली. कंपनीचा सध्या प्लांट कर्नाटकात आहे. त्यामुळे सध्याची शिक्षण संस्था ही केवळ कर्नाटक राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आहे. पण भविष्यात टोयोटा कंपनी इतर राज्यांमध्ये देखील असे उपक्रम राबवणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली.

टोयोटा टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टीट्यूटचा हा आराखडा आहे

कंपनी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत आग्रही

आम्ही कंपनीचा पूर्ण प्लांट बघितला. यावेळी कंपनी कर्मचाऱ्यांच्या फिटनेस आणि सुरक्षेसाठी खूप काळजी घेत असल्याचं निदर्शनास आलं. कंपनीने कर्मचाऱ्यांना सर्वात आधी स्वयंसुरक्षा मद इतर काम असं सूत्रच आखून दिलं आहे. त्यानुसार कंपनीत काम सुरु असल्याचं आमच्या निदर्शनास आलं. या कंपनीत मोठमोठी आधुनिक यंत्रसामग्री आहे. तसेच अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने कारखान्यात काम केलं जातं.

पर्यावरणाच्या बाबतीत टोयोटा संवेदनशील

टोयोटा कंपनी पर्यावरणाच्या बाबतीत अतिशय संवेदनशील आहे. या कंपनीचा कर्नाटकात बंगळुरु येथे मोठा प्लांट आहे. या प्लांटच्या जागेवर अनेक पार्क आहेत. इथे वेगवेगळ्या पशू-पक्षींच्या संवर्धनासाठी काम केलं जातं. पाण्याची बचत करण्यासाठी योग्य नियोजन केलं जातं. वन्य जीवांचं रक्षण व्हावं यासाठी खूप संवेदनशीलपणे काळजी घेतली जाते. या विविध पार्कमध्ये वेगवेगळ्या वनस्पती देखील आहेत.

विशेष म्हणजे सर्व पार्कची खूप निगा राखली जाते. पशू-पक्षींची अतिशय संवेदनशीलपणे काळजी घेतली जाते. कंपनीच्या ठिकाणी सोलार पॅनलचं मोठं जाळ विस्तारलेलं आहे. याशिवाय पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल? यासाठी देखील प्रयत्न करण्यात आले. वाहनांमधून कमीत कमी किंवा शून्य प्रदूषण होईल, असा उत्पादन करण्याचा कंपनीचा मानस आहे.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.