उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वसतिगृहांना आता ‘मातोश्री’ नाव, सामंतांची घोषणा, नाव बदलून व्यवस्था बदलेल? भाजपचा सवाल
उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सर्व वसतिगृहांना मातोश्री हे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.
नागपूर : राज्यात भविष्यात होणाऱ्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सर्व वसतिगृहांना मातोश्री हे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. घराबाहेर असलेल्या आणि वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आईचं प्रेम महत्वाचं असतं. त्यामुळे त्यांना आईच्या प्रेमाची ऊब मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं उदय सामंत म्हणाले. त्यावर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी नाव बदलून व्यवस्था बदलेल का? असा सवाल केला आहे.(Uday Samant announces to name hostels as ‘Matoshri’)
राज्यात उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत गरजू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण केली जातात. त्यात विद्यार्थ्यांना राहण्याची आणि खाण्याची सोय माफक दरात केली जाते. भविष्यात निर्माण केल्या जाणाऱ्या अशा प्रकारच्या वसतिगृहांना ‘मातोश्री’ हे नाव दिलं जाईल असं सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. त्यावर केशव उपाध्ये यांची प्रतिक्रिया घेतली असता, नामकर जरुर करा. पण वसतिगृहातील विद्यार्थ्यांची सुरक्षा, त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची चांगली सोय, लाईट, पाणी अशा सर्व सुविधा आधी उपलब्ध करुन द्या, अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर नाव बदलून वसतिगृहांची व्यवस्था बदलणार आहे का? असा सवालही त्यांनी उदय सामंत यांना केला आहे.
‘मातोश्री’च नाव का?
घराबाहेर राहणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना आईचं प्रेम महत्वाचं असतं. त्यामुळे आईच्या प्रेमाची ऊब मिळावी या साठी हा निर्णय घेतल्याचं सामंत यांनी सांगितलं आहे. असं असलं तरी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाचं नावही ‘मातोश्री’ आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुखांना खूश करण्यासाठी सामंतांनी हा निर्णय घेतला असवा, असा खोचक टोलाही विरोधक लगावत आहेत.
‘प्राध्यापकांची 40 टक्के पदं भरणार’
राज्यातील रिक्त अशलेल्या प्राध्यापकांच्या 40 टक्के जागा भरणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. त्याचबरोबर प्राचार्यांच्या भरतीलाही परवानगी दिल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं
भाजपच्या आंदोलनावर टीका
वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यांवरुन आज भाजपनं राज्यभरात महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन केलं. उदय सामंत यांनी भाजपच्या या आंदोलनावर टीका केली आहे. भाजपचं हे आंदोलन म्हणजे फक्त पेट्रोल-डिझेलचे वाढलेले भाव आणि त्याला होणाऱ्या विरोधाकडून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी असल्याचं सामंत यांनी म्हटलंय. अच्छे दिन येणार म्हणणारे सांगत होते की भाव स्थिर राहतील. पण प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाही. दिवसेंदिवस पेट्रोलचे भाव वाढत आहेत. त्यामुळे सर्वसाम्यान नागरिकांची मोठी आर्थिक कोंडी होत असल्याचं सामंत म्हणाले.
संबंधित बातम्या :
Maharashtra College Reopen | 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालय पुन्हा सुरु, 75 टक्के उपस्थितीची अट शिथील
भाजपने आधीच सुधीर मुनगंटीवारांकडे सर्व जबाबदारी दिली असती तर…? उदय सामंतांचं मोठं विधान
Uday Samant announces to name hostels as ‘Matoshri’