Uday Samant : कोरोना रुग्णांमध्ये वाढ, विद्यापीठ, कॉलेज सुरु की बंद? आज फैसला; उदय सामंत यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज दुपारी 12 वाजता राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरु आणि शिक्षण विभागाच्या अधिकारी, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची तातडीची बैठक बोलावली आहे.

Uday Samant : कोरोना रुग्णांमध्ये वाढ, विद्यापीठ, कॉलेज सुरु की बंद? आज फैसला; उदय सामंत यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक
उदय सामंत
Follow us
| Updated on: Jan 04, 2022 | 9:15 AM

मुंबई: महाराष्ट्रासमोरील कोरोना विषाणू (Corona) संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचं संकट अधिक गडद होत आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज दुपारी 12 वाजता राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरु आणि शिक्षण विभागाच्या अधिकारी, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची तातडीची बैठक बोलावली आहे. उदय सामंत या बैठकीत विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोरोनाची स्थिती आणि इतर बाबींची माहिती घेतील. आजच्या बैठकीत कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालय सुरु ठेवायची की नाही यासदंर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचं कळतयं.

उदय सामंत यांचं ट्विट

बैठकीला कोण उपस्थित राहणार

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बोलावलेल्या बैठकीला राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरु, शिक्षण विभागाचे अधिकारी, विभागीय आयुक्त,सर्व जिल्हाधिकारी उपस्थित असतील. ही बैठक ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. आजच्या बैठकीत कोरोनाच्यापरिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुढील शैक्षणिक धोरण काय असावे, याबाबत चर्चा होणार आहे. आजच्या बैठकीत महाविद्यालय आणि विद्यापीठ सुरु राहणार की नाही यासंदर्भातील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

कुलगुरु आणि शिक्षण विभागाचे अधिकारी अहवाल सादर करणार

ज्यातील कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरु असणाऱ्या परीक्षा, अभ्यासक्रम आणि महाविद्यालय सुरु ठेवण्यासंदर्भात नेमक्या काय उपाययोजना करता येतील, याविषयी बैठकीत चर्चा करण्यात येईल. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विद्यापीठांचे कुलगुरु आणि शिक्षण विभागाचे अधिकारी हे आजच्या बैठकीत अहवाल सादर करण्याची शक्यता आहे. हा, अहवाल सादर झाल्यानंतर त्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार असल्याचं कळतंय.

इतर बातम्या:

Uday Samant : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, विद्यापीठ, कॉलेज सुरु की बंद? मंत्री उदय सामंत म्हणाले…

जैतापूर प्रकल्पावरून राजकारण तापले; आम्ही स्थानिकांसोबत उदय सामंतांचे स्पष्टीकरण, चंद्रकांत पाटलांनाही लगावला टोला

Uday Samant call meeting with vice chancellors collector and divisional commissioner to take decision about college and university due to hike of corona cases

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.