Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

College Reopen : शाळांचं ठरलं..! महाविद्यालयांचा देखील प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे, उदय सामंत यांनी काय सांगितलं?

Maharashtra College Reopening Update : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भात महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. शाळांबरोबरच महाविद्यालये सुरू करण्यासाठी कॅबिनेटमध्ये आज निर्णय होणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.

College Reopen : शाळांचं ठरलं..! महाविद्यालयांचा देखील प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे, उदय सामंत यांनी काय सांगितलं?
उदय सामंत
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 3:30 PM

मुंबई : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भात महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. शाळांबरोबरच महाविद्यालये सुरू करण्यासाठी कॅबिनेटमध्ये आज निर्णय होणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. कोरोना स्थितीचा आढावा घेऊन महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला जाईल, असं उदय सामंत म्हणाले. कोरोना (Corona ) विषाणू संसर्ग अद्यापही सुरु आहे. कोरोना संसर्ग संपलेला नाही त्यामुळं निर्बंध आणि नियम लागू करुनच महाविद्यालय सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचं उदय सामंत म्हणाले आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सोमवार पासून शाळा सुरु करणार असल्याचं म्हटलं आहे. राज्यातील पहिली ते बारावीचे वर्ग सोमवारी 24 जानेवारीला कोरोना नियमावलीचंच पालन करुन सुरु होत आहेत. आजच्या कॅबिनेट बैठकीत कॉलेज सुरु करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेणार का याकडे राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे.

कॉलेज सुरु करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव पाठवणार

महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भात प्रत्येक जिल्हाधिका-यांना स्थानिक पातळीवर कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार दिले जातील. मुख्यमंत्र्यांना तसा प्रस्ताव आम्ही पाठवतोय. त्यांच्या आदेशानंतरच हा निर्णय होईल, असं उदय सामंत म्हणाले.

कोरोनाचं संकट कायम

कोरोनाचा धोका अजून गेलेला नाही, त्यामुळं निर्बंध लादूनच कॉलेज सुरू केली जातील, असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय. 15 फेब्रुवारीपर्यंत होणा-या सर्व परिक्षा ऑनलाईनच होतील, यावर आम्ही ठाम आहोत, असंही त्यांनी म्हटलं. सिंधुदुर्गात शिवसेना एक नंबरला असून दुसऱ्या क्रमांकावर भाजप तिसऱ्या स्थानी काँग्रेस आणि चौथ्या क्रमांकावर मनसे आणि पाचव्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं.

सोमवारपासून शाळा सुरु होणार

राज्यात ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग कमी असेल तिथं 24 जानेवारी पासून शाळा सुरु होतील. शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक पातळीवर शाळा सुरु करत असताना आपण गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्ग पाहत आहोत. त्यामुळं शाळा सुरु करत असताना नियमावलीचं पालन केलं पाहिजे. पूर्णपणे काळजी घेऊन शाळा सुरु करण्यात याव्यात असं, वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. पालकांची समंती असल्यानंतर विद्यार्थी शाळेत येतील. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, याची काळजी आम्ही घेत आहोत, असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

इतर बातम्या:

School Reopen : 24 जानेवारीपासून शाळा पुन्हा सुरु, बारावीपर्यंतचे वर्ग चालू होणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

NEET UG PG Counselling 2021 : वैद्यकीय प्रवेशातील 27 टक्के ओबीसी आरक्षणावर सुप्रीम मोहोर; केंद्राच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं ठरवलं योग्य

Uday Samant said College reopen decision will take by Chief Minister Uddhav Thackeray proposal sent to cm

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.