Uday Samant : विद्यापीठ, कॉलेज पुन्हा ऑनलाईन? उदय सामंत निर्णय जाहीर करणार
उदय सामंत यांनी कोविड-19 व ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ/महाविद्यालय आणि लसीकरणाबाबत दुरदृश्य प्रणालीद्वारे (ऑनलाईन) राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, अकृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या सोबत आढावा बैठक सुरू आहे.
मुंबई: महाराष्ट्रासमोरील कोरोना विषाणू (Corona) संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचं संकट अधिक गडद होत आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी काल राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरु आणि शिक्षण विभागाच्या अधिकारी, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील विद्यापीठे आणि त्याअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरु करावं असा सूर पाहायला मिळाला. महाविद्यालय कशी सुरु राहणार याबाबत आज निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
कॉलेज सुरु की बंद आज निर्णय
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल प्रत्येक जिल्ह्याचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतला. उदय सामंत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन महाविद्यालयातील शिक्षण ऑफलाईन की ऑनलाईन यासंदर्भातील निर्णय जाहीर करतील. मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या वसतिगृहांवर देखील निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे.
आज सर्व विभागीयआयुक्त,राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व कुलगुरू यांच्या समवेत बैठक ऑनलाईन पार पडली,कोविड19 बाबत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला,विद्यार्थीं, पालक,प्राध्यापक व कर्मचारी यांनी सुरक्षितते बद्दल चर्चा झाली. ह्या संदर्भात निर्णय उद्या सायं. 4.00 वाजता जाहीर करू.
— Uday Samant (@samant_uday) January 4, 2022
बैठकीला कोण कोण उपस्थित?
उच्च व इतर तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची कोविड-19 व ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ/महाविद्यालय आणि लसीकरणाबाबत दुरदृश्य प्रणालीद्वारे (ऑनलाईन) राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, अकृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या सोबत आढावा बैठक झाली आहे. बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधानसचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च व तंत्र शिक्षण संचालक धनराज माने, तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ, सर्व जिल्हाधिकारी, अकृषी विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित होते.
उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत ऑनलाईन बैठकीला राज्यातील 33 जिल्हाधिकारी, 6 विभागीय आयुक्त, आणि 13 कुलगुरू बैठकीला उपस्थित होते.
इतर बातम्या:
Uday Samant will declare decision about university and college online offline education due to corona