UGC AICTE : UGC AICTE पेटले ना राव ! म्हणे ‘पाकिस्तानात शिकलात’ तर ‘वाळीत’ टाकलं जाईल, विद्यार्थ्यांना तंबी !

भारतीय विद्यार्थ्यांनी पाकिस्तानातील कोणत्याही महाविद्यालयात किंवा शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेऊ नये. असं केल्यास ते आपल्या देशात कोणतीही नोकरी किंवा उच्च शिक्षण घेण्यास पात्र ठरणार नाहीत असं आवाहन विद्यापीठ अनुदान आयोग आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने काल केलंय.

UGC AICTE : UGC AICTE पेटले ना राव ! म्हणे 'पाकिस्तानात शिकलात' तर 'वाळीत' टाकलं जाईल, विद्यार्थ्यांना तंबी !
म्हणे 'पाकिस्तानात शिकलात' तर 'वाळीत' टाकलं जाईल,Image Credit source: facebook
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 3:32 PM

नवी दिल्ली : भारतीय विद्यार्थ्यांनी (Indian Students) पाकिस्तानातील (Pakistan) कोणत्याही महाविद्यालयात किंवा शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेऊ नये. असं केल्यास ते आपल्या देशात कोणतीही नोकरी किंवा उच्च शिक्षण घेण्यास पात्र ठरणार नाहीत असं आवाहन विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) काल (शुक्रवारी) केलंय. चिनी संस्थांमध्ये सुद्धा भारतीयांनी शिक्षण घेऊ नये असा इशारा दिल्यानंतर महिनाभरातच युजीसी आणि एआयसीटीईने विद्यार्थ्यांना संयुक्तपणे हा सल्ला दिलेला आहे. पाकिस्तानातील कोणत्याही पदवी महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या कोणत्याही भारतीय नागरिकाला किंवा परदेशी नागरिकाला पाकिस्तानमध्ये मिळालेल्या या शैक्षणिक पात्रतेचा भारतात उपयोग होणार नाही. थोडक्यात, पाकिस्तानातील शैक्षणिक पात्रतेच्या आधारे भारतात नोकरी मिळवता येणार नाही असं स्पष्ट करण्यात आलंय.

भारतात रोजगार मिळणार नाही

” सर्वांना (विद्यार्थ्यांना) उच्च शिक्षणासाठी पाकिस्तानात न जाण्याचा सल्ला देण्यात आलाय. भारतीय वंशाच्या (ओआयसी) कोणत्याही भारतीय नागरिकाला किंवा भारतीय वंशाच्या परदेशी नागरिकाला पाकिस्तानातील एखाद्या महाविद्यालयात किंवा एखाद्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घ्यायचा असेल तर यापुढे पाकिस्तानी प्रमाणपत्राच्या आधारे भारतात नोकरी किंवा उच्च शिक्षणासाठी पात्र ठरणार नाही. त्यांना गृह मंत्रालयाकडून सुरक्षा मंजुरी मिळाल्यास ते भारतात रोजगार मिळण्यास पात्र ठरतील.

भारतातील विद्यार्थ्यांना इतर देशांमध्ये समस्या आहेत

एआयसीटीईचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे यांच्या मते, भारतीय विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी कोणत्या देशात जायला हवं आणि कोणत्या शिक्षण संस्थेत प्रवेश घ्यायला हवा याबाबतचा सल्ला देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर युजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार म्हणाले,’विद्यार्थी परदेशात परत जाऊन शिक्षण सुरु ठेऊ शकत नाहीत, अशा अनेक समस्यांचा त्यांना सामना करावा लागतो त्यामुळे देशाबाहेर उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी युजीसी आणि एआयसीटीई अशा जाहीर सूचना जारी करतं.’

इतर बातम्या :

Nashik Accident : बुलडाणा, बीडनंतर आता नाशकात भीषण अपघात! वऱ्हाड्यांनी भरलेला टेम्पो उलटला, 13 जण जखमी

जगातील सर्वाधिक रोमँटिक लोक या देशात राहतात, वाचा सर्वेक्षण काय म्हणते!

Freedom fighter Kunwar Singh : कोण होते वीर कुंवर सिंह? ज्यांच्या विजयोत्सवावर अमित शाह जाणार अराहला

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.