यूजीसीचा मोठा निर्णय, केंद्रीय विद्यापीठांमधील प्रवेश परीक्षा रद्द, नेमकं कारण काय?

विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) यंदा केंद्रीय विद्यापीठांमध्ये (Central Universities) प्रवेश घेण्यासाठीची सामान्य प्रवेश परीक्षा रद्द केली आहे.

यूजीसीचा मोठा निर्णय, केंद्रीय विद्यापीठांमधील प्रवेश परीक्षा रद्द, नेमकं कारण काय?
विद्यापीठ अनुदान आयोग
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 12:27 PM

नवी दिल्ली: विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) यंदा केंद्रीय विद्यापीठांमध्ये (Central Universities) प्रवेश घेण्यासाठीची सामान्य प्रवेश परीक्षा रद्द केली आहे. कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर यूजीसीने हा निर्णय घेतला आहे. यूजीसीने ट्विटमध्ये म्हटले आहे की शैक्षणिक सत्र 2021-22 च्या केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी कॉमन एन्ट्रन्स टेस्ट घेतली जाणार नाही. यूजीसीने रविवारी (18 जुलै) रोजी याची घोषणा केली आहे.

कोरोनामुळे प्रवेश परीक्षा रद्द

केंद्रीय विद्यापीठांतील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांच्या निवडीसाठी प्रस्तावित सेंट्रल युनिव्हर्सिटी कॉम एन्ट्रन्स टेस्ट (CUCET 2021) यंदाच्या शैक्षणिक सत्राच्या 2021-22 पासून लागू केली जाणार नाही. तसेच यावर्षीही सर्व केंद्रीय विद्यापीठांमधील प्रवेश प्रक्रिया जुन्या नियमांनुसार घेण्यात येणार आहेत. CUCET म्हणजेच प्रवेश परीक्षा पुढील शैक्षणिक सत्रापासून म्हणजेच 2022-23 पासून लागू केले जाऊ शकते.

नवीन शिक्षण धोरणांतर्गत निर्णय

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने यापूर्वी केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेश हे प्रवेश परीक्षेच्या आधारे होतील असं जाहीर केलं होतं. मात्र, कोरोनामुळं प्रवेशासाठीची सीईटी रद्द करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय धोरण विषयक धोरण (NEP) 2020 अंतर्गत केंद्रीय विद्यापीठांमधील सर्व पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी CUCET च्या कार्यपद्धती तपासण्यासाठी एक समिती गठीत केली होती.

कोरोनामुळे सीईटी रद्द, यूजीसीची ट्विटरवरुन घोषणा

केंद्रीय विद्यापीठांमधील प्रवेशासाठीच्या प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा निर्णय यूजीसीनं जाहीर केला आहे. यूजीसीनं त्यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी देशातील कोरोना विषाणू ससंर्गाचा उद्रेक पाहता प्रवेश प्रक्रिया जुन्या पद्धतीनं होईल, असं सांगितलं. तर, केंद्रीय विद्यापीठांसाठी कॉमन एंट्रान्स टेस्ट 2022-23 पासून घेतली जाईल, असं सांगण्यात आलं आहे.

इतर बातम्या:

दहावीच्या विद्यार्थ्यांवर कौतूकाची थाप कुठेच कमी पडायला नको, ते स्व:कष्टानेच पास झाले : प्रा.डॉ.सुरेश सोनवणे

दहावी निकालानंतरच्या पुढील वाटा: ITI चे 91 अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना करतील आत्मनिर्भर

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.