UGC NET 2021 Admit Card: नेट परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर, यंदा दोन टप्प्यात परीक्षेचं आयोजन
नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची प्रवेशपत्र जारी करण्यात आली आहेत. नेट परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार NTA च्या ugcnet.nta.nic.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात.

UGC NET 2021 Admit Card नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची प्रवेशपत्र जारी करण्यात आली आहेत. नेट परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार NTA च्या ugcnet.nta.nic.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात. यूजीसी नेट परीक्षा 6 ऑक्टोबर 11 दरम्यान घेण्यात येणार होती. बदललेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा 6 ते 8 ऑक्टोबर आणि 17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. परीक्षा दोन सत्रांमध्ये आयोजित केली जाणार असून सकाळी 9 ते 12 या काळात एका बॅचचे पेपर होतील तर दुसऱ्या बॅचचे पेपर दुपारी 3 ते 6 या दरम्यान होतील,अशी माहिती एनटीएकडून देण्यात आली आहे.
UGC NET 2021 Admit Card डाऊनलोड कसं करावं?
स्टेप 1 : UGC NET ची अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.nic.in ला भेट द्या.
स्टेप 2 : होमपेजवर प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठीची लिंक पाहायला मिळेल त्यावर क्लिक करा.
स्टेप 3 : अर्ज क्रमांक आणि जन्मतारखेसह सुरक्षा कोड नोंदवून लॉगीन करा.
स्टेप 4 : लॉगीन केल्यानंतर प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
स्टेप 5: प्रवेशपत्र डाऊनलोड करा आणि पुढील संदर्भासाठी प्रिंट आऊट घ्या.
नेट परीक्षा वेळापत्रकात बदल
नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून यूजीसी नेट परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नेट परीक्षेचे आयोजन 6 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान करण्यात येणार होते. मात्र, नॅशनल टेस्टिंग एजन्सी या संदर्भातील नव्या तारखा जाहीर केल्या आहेत. बदललेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा 6 ते 8 ऑक्टोबर आणि 17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. परीक्षा दोन सत्रांमध्ये आयोजित केली जाणार असून सकाळी 9 ते 12 या काळात एका बॅचचे पेपर होतील तर दुसऱ्या बॅचचे पेपर दुपारी 3 ते 6 या दरम्यान होतील,अशी माहिती एनटीएकडून देण्यात आली आहे.
परीक्षेच्या तारखा का बदलण्यात आल्या?
10 ऑक्टोबरला इतर परीक्षा असल्यानं विद्यार्थ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या. काही विद्यार्थ्यांनी ही बाब एनटीएच्या लक्षात आणून दिली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं यानंतर यूजीसी नेट परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला.
कोरोनामुळं परीक्षा लांबणीवर
देशभरातील विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये ज्युनिअर रिसर्च फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी पात्रता परीक्षा घेतली जाते. यूजीसी नेट परीक्षा साधारणपणे वर्षातून दोन वेळा आयोजित केली जाते. जून आणि डिसेंबर या महिन्यामध्ये परीक्षेचे आयोजन केलं जातं. मात्र यावर्षी कोरोनामुळे डिसेंबरमध्ये परीक्षा आयोजित करण्यात आली नव्हती. नेट परीक्षा मे महिन्यामध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 2 ते 17 मे दरम्यान ही परीक्षा होणार होती. मात्र, कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे ही परीक्षा घेणे शक्य नव्हते. त्यामुळे ती परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती.
इतर बातम्या
NET Exam 2021: एनटीएकडून नेट परीक्षेच्या तारखांमध्ये बदल, नवं वेळापत्रक जाहीर
UGC NET 2021 Exam: JRF च्या वयोमर्यादेसंदर्भात मोठा निर्णय, NTA कडून नोटिफिकेशन जारी
UGC NET 2021 Admit Card released by National Testing Agency check details here for download