UGC NET 2021 Exam: JRF च्या वयोमर्यादेसंदर्भात मोठा निर्णय, NTA कडून नोटिफिकेशन जारी
विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) यूजीसी नेट परीक्षेसाठी ज्युनिअर रिसर्च फेलोशिप संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. कनिष्ठ संशोधन फेलोशिप (JRF) साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवण्यात आलीय.
नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) यूजीसी नेट परीक्षेसाठी ज्युनिअर रिसर्च फेलोशिप संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. कनिष्ठ संशोधन फेलोशिप (JRF) साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवण्यात आलीय. आता ज्या विद्यार्थ्यांचं वय 31 वर्षांपर्यंत आहे ते उमदेवार अर्ज दाखल करु शकतात. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) कनिष्ठ संशोधन फेलोशिप (JRF)च्या वयोमर्यादेसंदर्भात एक नोटीस जारी केली आहे. ही संधी फक्त आक्टोबर महिन्यात होणाऱ्या परीक्षेसाठी देण्यात आली आहे.
वयोमर्यादा का वाढवली?
जून सत्र UGC NET परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया कोरोनामुळे वेळेवर सुरू होऊ शकली नाही. या कारणामुळे वयोमर्यादा वाढवण्यात आली आहे. कोरोनामुळं वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. ओबीसी श्रेणीतील उमेदवारांसाठी तसेच एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/III लिंग श्रेणीतील उमेदवार आणि जेआरएफसाठी अर्ज करणाऱ्या महिला अर्जदारांसाठी कमाल वयोमर्यादा 5 वर्षांसाठी शिथील करण्यात आलीय.
संशोधन अनुभव असलेल्या उमेदवारांना जास्तीत जास्त वयोमर्यादेत शिथीलता दिली जाते. पदव्युत्तर पदवीच्या संबंधित विषयांमध्ये संशोधनासाठी घालवलेल्या कालावधीपर्यंत मर्यादित आणि जास्तीत जास्त 5 वर्षे सवलत जेआरएफ साठी दिली जाईल. तर, सहायक प्राध्यापक परीक्षेसाठी कोणतिही कमाल मर्यादा नाही.
नेट परीक्षा 6 ऑक्टोबरपासून
नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून यूजीसी नेट परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नेट परीक्षेचे आयोजन 6 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान करण्यात येणार आहे. परीक्षा दोन सत्रांमध्ये आयोजित केली जाणार असून सकाळी 9 ते 12 या काळात एका बॅचचे पेपर होतील तर दुसऱ्या बॅचचे पेपर दुपारी 3 ते 6 या दरम्यान होतील,अशी माहिती एनटीएकडून देण्यात आली आहे.
अर्ज करण्याची आणखी एक संधी
नॅशनल टेस्टिंग एजन्सी कडून यापूर्वी नेट परीक्षेसाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्यावेळी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले नव्हते त्यांच्यासाठी पुन्हा एकदा अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. पात्र विद्यार्थी 6 सप्टेंबर 2019 पर्यंत अर्ज दाखल करू शकतात. तर, 7 ते 12 सप्टेंबर दरम्यान अर्जामध्ये दुरुस्तीची विंडो सुरू राहील.कोरोना विषाणू संसर्गामुळे डिसेंबर 2020 ची परीक्षा उशिरा होत आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं डिसेंबर 2020 आणि जून 2021या दोन्ही परीक्षा जोडून एकत्र घेण्याचा निर्णय घेतला होता.
इतर बातम्या:
UGC NET Exam Dates: यूजीसी नेट परीक्षेच्या तारखा जाहीर, अर्ज करण्यासाठी आणखी संधी, वाचा सविस्तर
UGC NET 2021 exam Know the changes in age criteria for this exam only