UGC NET 2021: यूजीसी नेट परीक्षा पुन्हा लांबणीवर, ‘या’ तारखेपासून परीक्षा

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. देशभरातील विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये ज्युनिअर रिसर्च फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी पात्रता परीक्षा घेतली जाते.

UGC NET 2021: यूजीसी नेट परीक्षा पुन्हा लांबणीवर, 'या' तारखेपासून परीक्षा
UGC NET
Follow us
| Updated on: Oct 03, 2021 | 7:50 AM

UGC NET 2021 नवी  दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या तारखांमध्ये पुन्हा बदल करण्यात आले आहेत. यूजीसी नेट परीक्षा 6 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर आणि 17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येणार होती. बदललेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा 17 ते 25 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. परीक्षा दोन सत्रांमध्ये आयोजित केली जाणार असून सकाळी 9 ते 12 या काळात एका बॅचचे पेपर होतील तर दुसऱ्या बॅचचे पेपर दुपारी 3 ते 6 या दरम्यान होतील,अशी माहिती एनटीएकडून देण्यात आली आहे.

नेट परीक्षा वेळापत्रकात पुन्हा बदल

नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून यूजीसी नेट परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नेट परीक्षेचे आयोजन पहिल्यांदा 6 ऑक्‍टोबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान करण्यात येणार होते. मात्र, नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं नव्या तारखा जाहीर केल्या आहेत. बदललेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा 6 ते 8 ऑक्टोबर आणि 17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान होणार होते. नेट परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आले आहेत. आता परीक्षा 17 ते 25 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.

परीक्षेच्या तारखा का बदलण्यात आल्या?

10 ऑक्टोबरला इतर परीक्षा असल्यानं विद्यार्थ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या. काही विद्यार्थ्यांनी ही बाब एनटीएच्या लक्षात आणून दिली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं यानंतर यूजीसी नेट परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला.

UGC NET 2021 Admit Card डाऊनलोड कसं करावं?

स्टेप 1 : UGC NET ची अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.nic.in ला भेट द्या.

स्टेप 2 : होमपेजवर प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठीची लिंक पाहायला मिळेल त्यावर क्लिक करा.

स्टेप 3 : अर्ज क्रमांक आणि जन्मतारखेसह सुरक्षा कोड नोंदवून लॉगीन करा.

स्टेप 4 : लॉगीन केल्यानंतर प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.

स्टेप 5: प्रवेशपत्र डाऊनलोड करा आणि पुढील संदर्भासाठी प्रिंट आऊट घ्या.

कोरोनामुळं परीक्षा लांबणीवर

देशभरातील विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये ज्युनिअर रिसर्च फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी पात्रता परीक्षा घेतली जाते. यूजीसी नेट परीक्षा साधारणपणे वर्षातून दोन वेळा आयोजित केली जाते. जून आणि डिसेंबर या महिन्यामध्ये परीक्षेचे आयोजन केलं जातं. मात्र यावर्षी कोरोनामुळे डिसेंबरमध्ये परीक्षा आयोजित करण्यात आली नव्हती. नेट परीक्षा मे महिन्यामध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 2 ते 17 मे दरम्यान ही परीक्षा होणार होती. मात्र, कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे ही परीक्षा घेणे शक्य नव्हते. त्यामुळे ती परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती.

इतर बातम्या

CBSE 10th Compartment Results 2021: सीबीएसई दहावीच्या कंपार्टमेंट परीक्षेचा निकाल जाहीर, रिझल्ट कुठं पाहायचा?

Maharashtra School Reopen : सुरक्षितपणे शाळा कशी सुरु करायची? टास्क फोर्स मार्गदर्शन करणार, वेबिनार कुठं पाहायचं?

UGC NET 2021 exam postpone again by National Testing Agency check new dates here

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.