UGC NET 2021 Postpone : सीबीएसई, नीट पाठोपाठ नेटची परीक्षा लांबणीवर टाका, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची मागणी

राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नेट परीक्षा देखील लांबणीवर टाकावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. UGC NET 2021 exam postpone

UGC NET 2021 Postpone : सीबीएसई, नीट पाठोपाठ नेटची परीक्षा लांबणीवर टाका, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची मागणी
UGC NET वेबसाईट फोटो
Follow us
| Updated on: Apr 18, 2021 | 10:29 AM

पुणे: देशात कोरोना विषाणू संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात 2 लाख 61 हजार 500 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या गेल्या आहेत. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनकडून घेतली जाणारी नीट पीजी परीक्षा देखील लांबणीवर टाकली गेली आहे. वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता आता राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नेट परीक्षा देखील लांबणीवर टाकावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नॅशनल ईलिजिबिलिटी टेस्ट सहायक प्राध्यापक आणि ज्युनिअर रिसर्च फेलोशिप पात्रता परीक्षा म्हणून घेतली जाते. नॅशनल टेस्टिंग एजन्सी विद्यार्थ्यांच्या मागणीवर काय भूमिका घेणार याकडं लक्ष लागलं आहे. ( UGC NET 2021 exam postpone Maharashtra Students demands due to corona virus outbreak)

एनटीएच्या निर्णयाकडं विद्यार्थ्यांच लक्ष

नॅशनल ईलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच राष्ट्रीय पात्रता परीक्षाही इतर परीक्षांप्रमाणे पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. 2 मे ते17 मे दरम्यान नेटची परीक्षा होणार आहे. दरवर्षी नॅशनल टेस्टिंग एजन्सी ( एनटीए ) मार्फत सहायक प्राध्यापक पदासाठी परीक्षा घेतली जाते. मात्र, देशातला आणि राज्यातला वाढता कोरोनाचा संसर्ग पाहता परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. एमपीएससी, दहावी, बारावी, तसंच सीबीएसई बोर्डानं परीक्षा रद केल्या आहेत. नेटची परीक्षाही पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी विद्यार्थ्यांच्या मागणीवर काय निर्णय

नियोजित वेळापत्रकाप्रमाणं मे महिन्यात परीक्षा

UGC NET 2021 परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणं मे महिन्यातील 2, 3, 4, 5, 6, 7, 10, 11, 12, 14 आणि 17 तारखेला आयोजित केली जाणार आहे. तसेच डिसेंबर 2020 महिन्यातील यूजीसी नेटची परीक्षा कोरोनामुळे लांबली होती. ती आता 2021 च्या मे महिन्यात घेतली जाईल.

UGC NET Exam काय आहे?

देशभरातील विद्यापीठ तसेच अन्य उच्च शिक्षण संस्थांमध्ये कनिष्ठ संशोधक छात्रवृत्ती (Junior Research Fellowship) आणि सहाय्यक प्राध्यापक (Asisstant Professor) पदासाठी विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे (UGC) नॅशनल ईलिजिबिलिटी टेस्टचे (NET) आयोजन केले जाते. ही परीक्षा वर्षातून दोन वेळा जून आणि डिसेंबर महिन्यात घेतली जाते. मात्र, 2020 साली कोरोना महामारीमुळे या परीक्षांचे आयोजन लांबले.

संबंधित बातम्या:

UGC NET 2021: नेट परीक्षेसाठी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस, जाणून घ्या संपूर्ण माहिती

UGC NET 2021: नेट परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, जाणून घ्या संपूर्ण माहिती

( UGC NET 2021 exam postpone Maharashtra Students demands due to corona virus outbreak)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.