UGC NET 2022: युजीसी नेट परीक्षेसंदर्भात सोशल मीडियावर बनावट नोटीस व्हायरल, बळी पडू नका
यावर पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) हे रिपोर्ट पूर्णपणे बनावट असल्याचं स्पष्ट केलं आहे. यूजीसीकडून अशी कोणतीही नोटीस बजावण्यात आलेली नाही. सरकारने ही नोटीस बनावट असल्याचे म्हटले आहे.
युजीसी नेट परीक्षा (UGC NET Exam) 12, 13, 14 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. युजीसीने यापूर्वीच याची घोषणा केली आहे. पण आजकाल सोशल मीडियावर या परीक्षेच्या बातम्या व्हायरल (Viral News) होत आहेत, यात कम्प्युटरवर आधारित परीक्षा काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्याचं बोललं जात आहे. लवकरच यूजीसी नेट परीक्षेची नवी तारीख यूजीसीकडून जाहीर करण्यात येणार आहे. ही नोटीस सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यावर पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) हे रिपोर्ट पूर्णपणे बनावट असल्याचं स्पष्ट केलं आहे. यूजीसीकडून अशी कोणतीही नोटीस बजावण्यात आलेली नाही. सरकारने ही नोटीस बनावट असल्याचे म्हटले आहे.
बनावट नोटिसांवर विसंबून राहू नका
ही परीक्षा त्याच्या निर्धारित वेळेतच घेतली जाईल. पीआयबीने ट्विटर हँडलवर ही माहिती दिली आहे. यूजीसी नेट परीक्षा पुढे ढकलण्याच्या या फेक परिपत्रकापासून विद्यार्थ्यांनी सावध राहावे. त्यांनी लिहिले की, नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या नावाने प्रसारित करण्यात येत असलेल्या बनावट नोटिसमध्ये यूजीसी नेट परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
A #Fake notice being circulated in the name of the National Testing Agency claims that the UGC NET exam has been postponed#PIBFactCheck
▶️@DG_NTA has not issued this notice
▶️For official updates, visit https://t.co/rUhCOSavc2 pic.twitter.com/M8nGtZ9Mke
— PIB Fact Check (@PIBFactCheck) August 1, 2022
या तारखांना यूजीसी नेट परीक्षा होणार आहे
एनटीएने जाहीर केलेल्या यूजीसी नेट 2022 च्या वेळापत्रकानुसार, सहाय्यक प्राध्यापक आणि जेआरएफची परीक्षा 8, 9, 11,12 जुलै आणि 12 ऑगस्ट, 13, 14 ऑगस्ट रोजी होणार आहे. कोविडमुळे अधिवेशन लांबल्याने गेल्या वेळेपासून एटीएकडून एकाच वेळी दोन सायकल परीक्षा घेण्यात येत आहेत. यूजीसी नेटसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना लवकरच अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येणार आहे. एनटीए यूजीसी नेट 2022 चे प्रवेशपत्र ugcnet.nta.nic.in अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीने जाहीर करेल.